कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम

By Admin | Updated: June 18, 2014 01:40 IST2014-06-17T23:02:32+5:302014-06-18T01:40:26+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई मनात जिद्द असली की, यश हमखास मिळते. एका कामगाराच्या मुलीने परिस्थितीवर मात करून दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे.

Worker's daughter first in the taluka | कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम

कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
मनात जिद्द आणि चिकाटी असली की, यश हमखास मिळते. एका कामगाराच्या मुलीने परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने अभ्यास करून दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे.
अंबाजोगाई येथे एका कपड्याच्या दुकानावर कामगार असलेले व केज तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी सोमनाथ विभुते यांची मुलगी शुभदा विभुते हिने दहावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभदाचा निकाल पाहून तिचे वडील सोमनाथ विभूते यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले अन् कंठ दाटून आला.
सोमनाथ हे गतवर्षी पर्यंत गावीच म्हणजे केज तालुक्यातील भालगांव येथे रहात होते. मात्र शुभदा अभ्यासात हुशार असल्याने तिला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. यामुळे गाव सोडून अंबाजोगाई येथे यावे लागले. अंबाजोगाईला आल्यानंतर शुभदाच्या वडिलांनी एका कपड्याच्या दुकानावर नौकरी केली व दहा बाय दहा च्या एका पत्र्याच्या खोलीत राहून शुभदाला शिक्षणासाठी पैसे पुरविले. याची शुभदाला जाणीव होती. त्यामुळे तिने परिस्थितीवर मात करत मनातून दहावीचा अभ्यास केला. शुभदाचे वडिल दिवसभर राबराब राबायचे. शुभदाला शिकून मोठं करायचं, हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे आता शुभदाने ठरवले आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. असे तिने ‘लोकमत’ ला सांगितले.

Web Title: Worker's daughter first in the taluka