Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील साई श्रद्धा पार्कमध्ये २२ एप्रिल रोजी साधना सोनपेटकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी शैला सुनील सोनार (४४) सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असा हा संपूर्ण घटनाक्रम आहे.
हत्येनंतर मुलीला केला फोन
तपासात उघड झालेली सर्वात मोठी बाब म्हणजे, साधना यांची हत्या केल्यानंतर आरोपी शैलाने कोणताही वेळ न घालवता आपल्या मुलीला फोन लावला. "मी खून केला आहे, आता माझी माझी वाट पाहू नकोस," असे तिने थंड डोक्याने मुलीला सांगितले. पोलीस सध्या या मोबाईल संभाषणाची तांत्रिक पडताळणी करत आहेत.
आरोपीकडून सातत्याने जबाबात बदल
आरोपी शैला सोनार ही पोलिसांना तपासात अजिबात सहकार्य करत नसल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान ती प्रत्येक तासाला आपला जबाब बदलत आहे. पोलिसांना ती नवनवीन कहाण्या सांगत असल्याने तपासाला वेळ लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एका महिलेची हत्या केल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसून येत नसल्याने पोलीसही थक्क झाले आहेत.
ओळखीचे रूपांतर वादात आणि वादाचे हत्येत
साधना यांचे पती महेंद्र सोनपेटकर आणि शैला यांची जुनी ओळख होती. महेंद्र यांनी मदतीच्या भावनेतून शैलाला राहण्यासाठी स्वतःचा फ्लॅट भाड्याने दिला होता. मात्र, काही काळातच शैलाने त्या फ्लॅटवर मालकी हक्क सांगून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही कुटुंबात कडाक्याचे वाद सुरू झाले. इतकेच नाही तर, शैलाने महेंद्र यांच्यावर अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला होता, जे प्रकरण सध्या कोर्टात आहे. याच कायदेशीर वादाचा आणि वैयक्तिक रागाचा बदला घेण्यासाठी शैलाने साधना यांचा काटा काढल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
बजाजनगर पोलिसांनी शैला सोनारला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन दिवसांत पोलीस तिच्याकडून खुनासाठी वापरलेले हत्यार, यामागील नेमका कट आणि या गुन्ह्यात तिला इतर कोणी मदत केली आहे का, याचा शोध घेणार आहेत.
Web Summary : Shaila Sonar murdered Sadhana Sonpetkar and then calmly informed her daughter. Ongoing property disputes and a past legal case fueled the crime. Police investigation continues to uncover details.
Web Summary : शैला सोनार ने साधना सोनपेटकर की हत्या की और फिर शांति से अपनी बेटी को सूचित किया। संपत्ति विवाद और एक पिछला कानूनी मामला अपराध का कारण बना। पुलिस जांच जारी है।