शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन उशिरा होण्याला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

--- औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्यात उशिरा होत आहे. सीएमपी प्रणाली सुरू झाली, तरीही पगार उशिरा ...

---

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा पगार प्रत्येक महिन्यात उशिरा होत आहे. सीएमपी प्रणाली सुरू झाली, तरीही पगार उशिरा होत असल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होते आहे. शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभाग आणि वित्त विभागाच्या टोलवाटोलवीकडे बोट दाखवले जात आहे, तर शिक्षण विभाग वेतन उपलब्धतेअभावी पगार करण्याला या महिन्यात उशीर झाल्याचे सांगत आहे.

प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले, वेतन विलंबाने झाल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी होते. सीएमपी प्रणाली सुरू होऊन विहित मुदतीत प्रक्रिया राबविली जात नसल्याने विलंब होतो.

शिक्षक सेनेचे दीपक पवार म्हणाले, अकरा महिन्यांचे आणि आठ महिन्यांचे बजेट मागण्याचे काम शिक्षण विभागाचे आहे. सेवार्थचे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी असताना त्यांचे पगार जर पाच तारखेपर्यंत होतात, तर शालार्थचे काम का होत नाही?

---

जबाबदार कोण ?

---

वेतनासाठी आवश्यक चारमाही बजेट अनुदान अद्याप मिळालेले नाही. कोरोनामुळे वेतन अनुदानाला अडचणी निर्माण होत आहेत. २० टक्के वेतनाचे मे-जूनचा पगार अदा करता आला नाही, तर १०० टक्के वेतनाचे जून महिन्याचे वेतन अद्याप देता आले नाही. अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांच्या साडेआठ हजार शिक्षकांसाठी ७० कोटींच्या वेतन अनुदानाची मागणी केलेली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अनुदान मिळाल्यावर तत्काळ वेतन अदा केले जाईल.

- बाळासाहेब पवार, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक विभाग, औरंगाबाद

---

जूनपर्यंत वेतन अदा झालेले आहे. दर महिन्याला २० टक्के, ४० टक्के आणि १०० टक्के अनुदानित, असे पाच हजार शिक्षकांच्या पगारासाठी सुमारे २० कोटी रुपये लागतात. शासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयाला अद्याप वेतन अनुदान दिले नाही. एरव्ही अनुदान उपलब्ध असताना वेतनाला उशीर होत नाही.

- दिलीपकुमार जवळकर, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी, प्राथमिक विभाग, औरंगाबाद

---

शिक्षणाधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या २५ तारखेला बिल पाठविले पाहिजे. मात्र, त्यांना वेतन अनुदान शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून विलंबाने मिळत आहे. त्यामुळे त्यांची बिले उशिरा येत आहेत. बिले आली त्याचदिवशी कोषागारात पाठवली जातात. वित्त विभागात उशीर होत नाही.

- अप्पासाहेब चाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि. प. औरंगाबाद.

----

जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातील अडथळे दूर करण्यासाठी सीएपीम प्रणालीद्वारे वेतन गेल्या महिन्यापासून सुरू झाले. मात्र, या महिन्यात वेतन अनुदान उपलब्ध व्हायला उशीर झाल्याने वेतनाला उशीर झाला. नुकतेच अनुदान उपलब्ध झाल्याने आता अडचण येणार नाही.

- डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद