शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सिंचन विभागात जातात तेव्हा...

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल गुरुवारी सिंचन विभागात गेल्या आणि क्षणार्धात ही बातमी जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कानोकान झाली.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शारदा जारवाल गुरुवारी सिंचन विभागात गेल्या आणि क्षणार्धात ही बातमी जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या कानोकान झाली. सदस्यांनी झटपट सिंचन विभाग गाठला. अध्यक्षांची गेल्या आठवडाभरातील सिंचन विभागातील दुसरी भेट आणि त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या सदस्यांमध्ये सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळाची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातही जारवाल सिंचन विभागात गेल्या होत्या. तेव्हापासून काही ‘बोलबच्चन’ सदस्यांचे कान टवकारले होते. अध्यक्षा गुरुवारी पुन्हा सिंचन विभागात गेल्या. त्यांच्या मागोमाग काही ‘बिच्चारे’ सदस्यही गेले. सिंचन विभागात त्यांची अध्यक्षांशी चर्चा झाली. त्यावरून अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना फायली दाखविण्याचे फर्मान सोडले. या हालचालीवर लक्ष ठेवून असलेले बोलबच्चन सदस्य क्षणार्धातच तेथे धडकले. तेथे ‘बोलबच्चन’ व ‘बिच्चाऱ्या’ सदस्यांत हमरातुमरी झाली व फायली दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही संधी साधून हळूच पोबारा केला. कर्मचाऱ्यांना ‘सुंबाल्या’ करण्यास संधी मिळावी, अशी व्यूहरचनाच बोलबच्चन सदस्यांची होती, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. प्रश्न असा निर्माण होतो की, नेमकी कोणती फाईल दडवून ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत व कशासाठी. प्रशासकीय कामकाज पद्धतीशी नव्यानेच संपर्क आलेल्या अध्यक्षांपासून सदस्य व अधिकारी काय लपवीत आहेत. यासंदर्भात अध्यक्षांना विचारले असता, तसे काहीच नव्हते, कर्मचारी, अधिकारी काम करतात की नाही, हे पाहण्यासाठी मी गेले होते, असे पत्रकारांना सांगतात. मग कामकाज पाहण्यासाठी दोन्ही वेळा सिंचन विभागच का, असा प्रश्नही निर्माण होतो. पत्रकारांनी अध्यक्षांना गाठून यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करताच, अध्यक्षांना काही सदस्यांनी पुन्हा गराडा घातला. गळ्यापर्यंत येणारे बोल दाबून टाकण्याची अध्यक्षांची केविलवाणी कसरत तेव्हाही प्रतिबिंबित होत होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हाताला लागतील तेवढी कामे खेचण्याच्या प्रयत्नात बोलबच्चन सदस्य आहेत. त्यातील सिंचन विभागावर सर्वांचेच लक्ष आहे. फेब्रुवारीपासून या विभागाच्या संचिका तुंबून होत्या. न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकलेल्या ८ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचे दायित्व यंदा बाजूला ठेवत ती रक्कम नव्या कामांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगोलग मागील चार दिवसांत काही सदस्यांच्या संचिकांना वित्त विभागाने मंजुरी दिल्याची माहिती वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी दिली आहे, आता बोला.