शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

'पोलिसांना कसली मस्ती?' ओळखपत्र असूनही कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याने शिरसाट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:08 IST

माजी महापौर विकास जैन जखमी, संतापलेल्या शिरसाटांचा पोलीस आयुक्तांना खडा सवाल

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांची आतुरता शिगेला पोहोचलेली असतानाच, आज सकाळी मतमोजणी केंद्राबाहेर रक्ताचा सडा पडला. गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी महापौर विकास जैन यांच्यासह चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट प्रचंड संतापले असून, त्यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून "पोलिसांना कसली मस्ती आहे?" असा संतप्त सवाल विचारला आहे.

काय घडले मतमोजणी केंद्रावर? 
आज सकाळी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी रांगेत उभे होते. यावेळी अधिकृत ओळखपत्रे सोबत असतानाही पोलिसांनी प्रतिनिधींना अडवल्याचे सांगितले जाते. यातून झालेल्या वादाचे पर्यावसान लाठीमारात झाले. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव आणि इतर तीन कार्यकर्ते रक्ताळलेल्या अवस्थेत केंद्राबाहेर पडले.

शिरसाटांचा 'रुद्र' अवतार आणि ठिय्या 
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींची अवस्था पाहून त्यांचा संयम सुटला. त्यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांना फोन करून आपला तीव्र निषेध नोंदवला. "प्रतिनिधींकडे आयकार्ड असताना बळाचा वापर करणे हा शुद्ध मस्तवालपणा आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना पोलीस बेफिकीर आहेत आणि प्रतिनिधींना मारहाण करतात, ही कसली कायदा-सुव्यवस्था?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दोषी पोलीस अधिकारी 'देशमुख' यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, पण तणाव कायम 
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, जोपर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा एकही प्रतिनिधी मतमोजणीसाठी आत जाणार नाही, असा पवित्रा शिंदेसेनेच्या उमेदवारांनी घेतला आहे. सध्या सर्व उमेदवारांनी केंद्राबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले असून मतमोजणीची प्रक्रिया ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Minister Furious After Police Lathi-Charge Workers Despite ID Cards

Web Summary : Chaos erupted at a counting center in Chhatrapati Sambhajinagar as police lathi-charged Shiv Sena (Shinde faction) workers, injuring several, including ex-mayor Vikas Jain. Minister Shirsat condemned the police action, demanding accountability for the violence and halting vote counting.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाट