शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची घडी अद्यापही विस्कटलेलीच

By admin | Updated: May 8, 2014 00:19 IST

औरंगाबाद : महापालिकेतील पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याची घडी विस्कटलेलीच आहे.

औरंगाबाद : महापालिकेतील पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमुळे शहरातील पाणीपुरवठ्याची घडी विस्कटलेलीच आहे. सिडको-हडकोतील वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शहरातील वेळापत्रक बिघडले आहे. गजानन महाराज मंदिर, कडा परिसरात आज पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली. महावितरणचा विजेचा लपंडाव, टँकरची वाढती संख्या, अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी वाढत असून, दोन महिन्यांपासून सिडको-हडकोसह शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. गेल्या आठवड्यात सिडको-हडकोतील नगरसेवक एन-५ येथील जलकुंभ परिसरात ठाण मांडून होते. ४५ मिनिटांवरून १५ मिनिटांवर पाणीपुरवठा आल्यामुळे नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात बैठकही घेतली. पाण्याच्या वितरणाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वैशाख महिना सुरू झाला आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढत आहे. महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे मनपाचे नियोजन कोलमडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे मनपाचे मत आहे. काही दिवसांपासून गजानन कॉलनी भागामध्ये पाणीपुरवठा होत नाही. जवाहर कॉलनी, शिवशंकर कॉलनी, दशमेशनगर, संग्रामनगर, हर्सूल, जटवाडा, सिडको-हडको, एन-४, गारखेडा या परिसरांसह जुन्या शहरातही पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. जायकवाडीतून उपसलेले पाणी जायकवाडीतील डाव्या कालव्यालगत असलेल्या मनपाच्या जलउपसा केंद्राने ७०० व १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्यांसाठी ८ पंपांच्या मदतीने पाणी उपसले जाते. जानेवारीमध्ये सरासरी १५० एमएलडी पाणी घेतले जात होते. एप्रिलमध्ये १५६ एमएलडी पाणी घेतले. मेमध्ये १५६ एमएलडी पाणी उपसले जात आहे. जानेवारीत १५० एमएलडी पाणी उपसले जात असताना शहरात ओरड नव्हती. आज १५६ एमएलडी पाणीपुरवठा होत असतानाही ओरड होत आहे. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय आहे.