शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी थेट घरांमध्ये; सुरक्षितताही धोक्यात

By admin | Updated: June 23, 2016 01:16 IST

बीड : इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र न पाहता डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची सुरक्षा पुरती धोक्यात आली आहे.

बीड : इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र न पाहता डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची सुरक्षा पुरती धोक्यात आली आहे. कायद्याचे रक्षणकर्तेच मूलभूत सोयी- सुविधांना पारखे आहेत. पोलीस वसाहतींना समस्यांनी घेरले असून सांडपाणी घरांमध्ये शिरत असल्याने कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत. तुटलेल्या दरवाजे व भिंतींना पडलेल्या भेगांमुळे सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.शहरात तीन ठिकाणी पोलीस वसाहती आहेत. अधीक्षक कार्यालयामागे, बशीरगंज भागात तसेच बालेपीर भागातील वसाहतींचा यात समावेश आहे. बुधवारी ‘लोकमत’ने पोलीस अधीक्षक कार्यालयास चिकटून असलेल्या वसाहतीचा आढावा घेतला. निजामकाळात वसलेल्या या वसाहतीला आता जुनी पोलीस कॉलनी या नावाने ओळखले जाते. या वसाहतीत ५० कुटुंबे राहतील एवढी घरे आहेत. वसाहतीत पाऊल ठेवताच उग्र वास येतो. डुकरांचा मुक्त संचार व सुबाभळींचा विळखा आहे. नाल्यांची एवढी दुरवस्था झाली आहे की, सांडपाण्याचे अक्षरश: गटार झाले आहे. नाल्यातील पाणी वाहून जात नसल्याने ते तुंबते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची भर पडल्यास सांडपाणी घरांमध्ये शिरते. रस्ते व घराचा उंबरठा बरोबरीत असून पावसानंतर तळ्याचे स्वरुप येते. अंगणातील पाणी घरात शिरल्याने हाल होतात, असे पोलीस पत्नीने सांगितले.वसाहतीत पाण्याची समस्या अतिशय गंभीर असून एक हातपंप होता;परंतु तो अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. पालिकेचे टँकर येते; परंतु आठ दिवसाला. राहायलाच जागा पुरत नाही, त्यामुळे पाणी साठवून ठेवणेही शक्य होत नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कुपनलिकेतून नळजोडणी घेतलेली आहे. ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने धुणी, भांडी करण्यासाठी वापरले जाते. बहुतांश कुटुंबांना विकतचे पाणी घ्यावे लागते. (प्रतिनिधी)