शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगजेब कबरीबाबत इशारा; मिलिंद एकबोटे आणि समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:00 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाबंदी काढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेब कबर नष्ट करण्याचा इशारा माजी आमदार तथा धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी दिला आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी "छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असून सदर चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तिव्र झालेल्या आहेत. त्याबाबत सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पहावयास मिळत आहे. तसेच दिनांक १७ मार्च पासून बजरंग दल व विश्व हिंदू परिषद संघटनेने औरंगजेब याची कबर हटवावी यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे. यातच माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी देखील कबर नष्ट करण्याचा इशारा दिलेला आहे. दरम्यान, धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण, हिंदू एकता मोर्चा, समस्त हिंदू आघाडी, शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन यांचेकडून दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी वढू- तुळापूर येथे संभाजी महाराज श्रद्धांजली यात्रा रॅली काढली जाते. तसेच संभाजी महाराज यांचे पुण्यतिथीनिमीत्त वढू-तुळापूर येथे हजारो कार्यकर्ते जमा होवून महाराजांना मानवंदना देतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही २९ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मोठ्या प्रमाणावर माजी आमदार मिलिंद एकबोटे व त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते, सदस्य व समर्थक लोक जमा होणार असून तेथून संभाजी महाराज यांना मानवंदना दिल्यानंतर ते खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्रशासनास मिळाली आहे. यावरून माजी आमदार एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास १६ मार्च २०२५ ते ५ एप्रिल २०२५ पर्यंत बंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यानी दिले आहेत. 

पोलिस अहवालात काय?
पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मियांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरिल अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्वावादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी आमदार तथा अध्यक्ष "धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण", "हिंदू एकता मोर्चा", "समस्त हिंदू आघाडी", "शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन" यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हाबंदी आदेश काढले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMilind Ekboteमिलिंद एकबोटे