शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाचपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघांत मतटक्का वाढला; एकात झाली घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:06 IST

पाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील पाच मंत्र्यांपैकी चार मंत्र्यांच्या मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली असून, एका मंत्र्यांच्या मतदारसंघात मात्र घटली आहे.

राज्याचे पणन आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात यंदा ८०.७० टक्के इतके विक्रमी मतदान झाले. २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी ७५.२५ टक्के होती. यंदा ५.४५ टक्के मते वाढली आहेत. अब्दुल सत्तार यांना २०१९ मध्ये ५१.७५ टक्के मते मिळाली होती.

परळी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात यंदा ७५.२७ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये ते ७३.१२ टक्के होते. म्हणजे २०१९ पेक्षा यंदा २.१५ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ मध्ये मुंडे यांना ५४.४५ टक्के मते मिळाली होती.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा मतदारसंघात यंदा ६९.८३ टक्के मतदान झाले आहे. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत येथे ६८.३१ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये सावंत यांना ४९.६२ टक्के मते मिळाली होती. यंदा मतदानात थोडीशी वाढ झाली आहे. परांडामध्ये १.५२ टक्के मतदान वाढले आहे.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उदगीर मतदारसंघात यंदा ६७.११ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ही आकडेवारी ६०.०६ होती. यंदा ६.०५ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ मध्ये बनसोडे यांना ५३.६४ टक्के मते मिळाली होती.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मात्र यंदा मतदानात घट झाली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्या या मतदारसंघात यंदा ६०.३० टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ही आकडेवारी ६३.२० इतकी होती. त्यावेळी सावे यांना ४८.१ टक्के मते मिळाली होती.

सिल्लोडमध्ये सर्वाधिक मतदानवाढपाच मंत्र्यांपैकी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याखालोखाल धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये मतदानात वाढ झाली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वsillod-acसिल्लोडparli-acपरळीudgir-acउदगीरparanda-acपरांडा