शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससोबत सरकार स्थापन करणारे उद्धव ठाकरेच खरे दगाबाज, संजय शिरसाटांचे टीकास्त्र

By बापू सोळुंके | Updated: November 8, 2025 18:34 IST

उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांशी काही देणं घेण नाही.त्यांना केवळ राजकारण करायचं आहे.

छत्रपती संभाजीनगर:उद्धव ठाकरे यांचा 'दगाबाज रे'चा नारा हा त्यांच्या स्वत:साठीच आहे. कारण युतीमध्ये निवडणूक लढवून त्यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले होते. उद्धव ठाकरे दगाबाज आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या दगाबाज संवाद दौऱ्यावर शिंदेसेनेचे प्रवक्ता तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज (दि. ८) टिका केली.

मंत्री शिरसाट म्हणाले की, एकतर ठाकरेंच्या मागे कोणीच नाही. पारावर बसून लोक जमवू शकत नाही ,यामुळे त्यांचे कोण ऐकणार आहे. ठाकरेंना शेतकऱ्यांशी काही देणं घेण नाही.त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. या दौऱ्यातही ते शेतकऱ्यांपेक्षा राजकारणावर अधिक बोलत असतात, असा आरोप शिरसाट यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविषयी शुक्रवारी रात्री केलेल्या ट्वीटविषयी विचारले असता ते म्हणाले, काही लोक राजकारणात स्वतः न्यायमूर्ती आहे अस दाखवता. आता सुरू असलेल्या पुणे जमिन खरेदी प्रकरणात त्यांनी बोलले नाही. त्यामुळे मी ट्विट केलं आहे.

अजित पवार यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक कौटुंबिक वातावरण वेगळे असते, मुल न विचारता निर्णय घेता का बघितलं पाहिजे. पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याविषयी या विषयावर मुख्यमंत्री बोलले आहेत, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही जमिन लाटल्याचा आरोप झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता शिरसाट यांनी तक्रार आली तर सरकारकडून चौकशी होईल असे सांगितले. पुणे येथील असो किंवा अन्य कुठलीही महार वतन जमीन विकत घेता येत नाही किंवा वापरता येतं नाही. जागा समाजासाठी असते, यावर ही आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मैत्रीपूर्ण होईलस्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. निवडणुकीत कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचं म्हणत आहे. यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. वैजापूर कन्नड,सिल्लोड,वैजापूर येथे आमचे आमदार आहे. त्यांचं ऐकावं लागते. भाजपकडे आहे त्या जागेवर त्यांनी लढवले पाहजे. याविषयीचे निर्णय स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात.

जरांगे आणि मुंडेची नार्कोटेस्ट व्हावीमनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहे. सरकारने दोघांची नार्को टेस्ट केली पाहिजे.यातून सत्य जनतेसमोर येईल,सरकारने याबाबत निर्णय घ्यावा,असेही शिरसाट म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat slams Thackeray: Betrayer Uddhav formed government with Congress.

Web Summary : Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray, calling him a betrayer for forming a government with Congress after contesting elections in alliance. He also commented on local elections and demanded narco tests for Jarange and Munde.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर