पुन्हा दोन वाहने जाळली
By Admin | Updated: August 13, 2014 01:42 IST2014-08-13T01:35:01+5:302014-08-13T01:42:17+5:30
रविवारी पहाटे रोशन गेट रोडवरील रहीमनगर येथील मोहंमद सलीम खान यांची दोन वाहने जाळण्यात आली.

पुन्हा दोन वाहने जाळली
औरंगाबाद : चंपाचौक, कैसर कॉलनी परिसरात चार दिवसांपूर्वी दोन वाहने जाळल्याचे प्रकरण ताजे असतानाच रविवारी पहाटे रोशन गेट रोडवरील रहीमनगर येथील मोहंमद सलीम खान यांची दोन वाहने जाळण्यात आली. त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.
चंपाचौक येथे खलील कुरैशी यांच्या मालकीच्या दोन गाड्या यापूर्वी जाळण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे वाहने जाळणारा आरोपी एका चिठ्ठीवर पुन्हा येणार असल्याची धमकीही देऊन जातो. आरोपीच्या या धाडसाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रहीमनगर भागात गल्ली नं. १ मध्ये राहणारे मोहंमद सलीम खान यांची वाहने (एमएच-२०-एएच- ६३०३), (एमएच२१- एएच- ७९३९) घरासमोर ठेवली असताना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जाळण्यात आली. या घटनेत दोन्ही वाहने पूर्णपणे जळून राख झाली असून, सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.