अंबाजोगाईत दोन अपघातांत दोन ठार

By Admin | Updated: June 18, 2014 01:39 IST2014-06-17T23:00:23+5:302014-06-18T01:39:59+5:30

अंबाजोगाई: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने या भीषण अपघातात सुभाष नामदेव हारगावकर (वय २८) रा. मुलेगाव, ता. केज हा जागीच ठार झाला.

Two casualties in Ambajogai killed two | अंबाजोगाईत दोन अपघातांत दोन ठार

अंबाजोगाईत दोन अपघातांत दोन ठार

अंबाजोगाई: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने या भीषण अपघातात सुभाष नामदेव हारगावकर (वय २८) रा. मुलेगाव, ता. केज हा जागीच ठार झाला. हा अपघात अंबाजोगाई साखर कारखाना रस्त्यावरील लातूर चौकात सोमवारी सायंकाळी झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.
तर दुसरा अपघात अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर वाघाळा पाटीजवळ झाला. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास ट्रॅक्टरच्या हेडवर बसून सय्यद सादिक सय्यद सत्तार (वय १९, रा. सातेफळ) हा लातूरहून सातेफळकडे येत होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात सय्यद सादिक हेडवरून खाली पडला.
गंभीर जखमी झालेल्या त्यांना उपचारासाठी रात्री स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
या दोन्ही अपघातांचे गुन्हे ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two casualties in Ambajogai killed two