शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

लिव्हरच्या रुग्णांना औषधी विक्रेत्यांकडून यातना

By admin | Updated: September 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : लिव्हरच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एल्बुमीन कन्टेन असलेल्या औषधीला केंद्र शासनाने रेट कंट्रोलमध्ये समाविष्ट करताना औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला

औरंगाबाद : लिव्हरच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या एल्बुमीन कन्टेन असलेल्या औषधीला केंद्र शासनाने रेट कंट्रोलमध्ये समाविष्ट करताना औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे ही औषधी उपलब्ध आहे, त्यांनी चक्क काळ्याबाजारात विक्री सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.लिव्हर, पोटाच्या आजाराच्या विविध शस्त्रक्रिया, आयसीयूमध्ये असलेल्या अनेक रुग्णांना एल्बुमीन या कन्टेनच्या औषधींची गरज असते. शंभर एमएलमध्ये ही औषधी कालपरवापर्यंत उपलब्ध होती. अलीकडेच केंद्र शासनाने प्राईज कंट्रोल अ‍ॅथॉरिटीने औषधीला रेट कंट्रोलमध्ये आणले. त्यामुळे बाजारातून औषधींचा साठाच गायब झाला आहे. शहरातील अनेक लहान मोठ्या रुग्णालयांमध्ये औषधोपचार घेणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात लवकरात लवकर ठोस पावले न उचलल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे काही औषध विक्रेते आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. बाजारात एल्बुमीनशिवाय इतर दुसरे कोणतेही औषध उपलब्ध नाही. पूर्वी हे औषध आठ हजार रुपयांना मिळत होते.केंद्राच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर त्याची किंमत ३ हजार ८०० रुपये करण्यात आली. औरंगाबादेतील औषध विक्रेते मुबारक चाऊस यांनी सांगितले की, दररोज किमान आठ ते दहा नागरिक या औषधीसंदर्भात विचारणा करीत आहेत.आमच्याकडे आणि मोठ्या स्टॉकिस्टकडे औषध उपलब्ध नाही. रुग्णांचे नातेवाईक पर्यायी औषधी द्या, अशी मागणी करतात. त्यालाही आमचा नाईलाज आहे.