मुकुंदवाडीत तीन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 10, 2014 01:00 IST2014-06-10T00:50:58+5:302014-06-10T01:00:32+5:30

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील विश्वकर्मानगरमध्ये चोरट्यांनी घर फोडून साडेनऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व १६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज पळविला.

Three lakhs of bungalow in Mukundwadi | मुकुंदवाडीत तीन लाखांची घरफोडी

मुकुंदवाडीत तीन लाखांची घरफोडी

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील विश्वकर्मानगरमध्ये चोरट्यांनी घर फोडून साडेनऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व १६ हजार रुपयांची रोकड, असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज पळविला. ही घटना रविवारी पहाटे घडली.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विश्वकर्मानगरमध्ये अशोक सोनाजी लहाने यांचे घर आहे. शनिवारी रात्री उकाडा असह्य झाल्यामुळे अशोक लहाने यांची पत्नी मुलांसह गच्चीवर झोपली, तर अशोक व त्यांचा मुलगा घरात हॉलमध्ये झोपले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जिन्यातून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाट उचकटून २८ ग्रॅमच्या सोन्याच्या पुतळ्या, ३० ग्रॅमचे सोन्याचे कडे, १० ग्रॅमची सोन्याची वेल, १५ ग्रॅमची चेन, १२ ग्रॅमची अंगठी, असे एकूण ९५ ग्रॅमचे दागिने व १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
या घटनेसंबंधी आज सोमवारी अशोक लहाने यांनी मुकुंदवाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक पाडवी हे आपल्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले. उपनिरीक्षक पाडवी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
२८ ग्रॅमच्या सोन्याच्या पुतळ्या, ३० ग्रॅमचे सोन्याचे कडे, १० ग्रॅमची सोन्याची वेल, १५ ग्रॅमची चेन, १२ ग्रॅमची अंगठी व १६ हजार रुपयांची रोकड असा २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

Web Title: Three lakhs of bungalow in Mukundwadi