शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर बंद असल्याने शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी जलकुंभावर रांगा

By admin | Updated: March 14, 2016 00:40 IST

लातूर : लातूर मनपाने डोंगरगाव उच्च पातळी बंधारा, भंडारवाडी, माकणी प्रकल्पातील पाणी मोठ्या टँकरने आणून शहरातील जलकुंभात साठविले आहे.

लातूर : लातूर मनपाने डोंगरगाव उच्च पातळी बंधारा, भंडारवाडी, माकणी प्रकल्पातील पाणी मोठ्या टँकरने आणून शहरातील जलकुंभात साठविले आहे. त्यामुळे जलकुंभांवर गेल्या दोन दिवसांपासून शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी दिवस-रात्र रांगा लागल्या आहेत. शहरातील गांधी चौक, बार्शी रोड, विवेकानंद चौकातील जलकुंभात गेल्या दोन दिवसांत २५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे ५० लाख लिटर्स पाणी संकलित केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभात हे पाणी टाकले आहे. परंतु, अद्याप छोट्या टँकरद्वारे त्याचे वितरण प्रभागनिहाय केले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आता जलकुंभावरच धाव घेतली असून, तेथून पाणी भरले जात आहे. गांधी चौकातील जलकुंभाच्या जलवाहिनीवरून पाणी भरण्यासाठी जुन्या बसस्थानकापर्यंत रांगा लागल्या आहेत. शिवाय, मनपाच्या गेटसमोरही पाणी भरण्यासाठी अशाच रांगा लागल्या आहेत. विवेकानंद चौकातील जलकुंभावरही गंजगोलाईच्या पूर्व भागातील वस्त्यांतून नागरिक पाणी भरण्यासाठी येत आहेत. रात्रं-दिवस या तिन्ही ठिकाणी पाण्यासाठी रांगा आहेत. मनपा प्रशासनाने अद्याप प्रभागनिहाय टँकरचे वितरण केलेले नाही. पाणी संकलित करण्यासाठीच मनपाचे अधिकारी मोहिमेवर आहेत. भंडारवाडी, डोंगरगाव, माकणी येथील नागरिकांचा विरोध पत्करून मोठ्या क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी संकलित केले जात आहे. शहरातील सर्व जलकुंभात मोठ्या प्रमाणात पाणी साठविल्यानंतर छोट्या टँकरद्वारे शहरात वितरण करण्याचे नियोजन मनपाचे आहे. मात्र पाण्याची भीषण टंचाई असल्याने टँकरची वाट न पाहता नागरिक स्वत: जलकुंभावर जाऊन पाणी आणत आहेत.गांधी चौकातील जलकुंभातील पाणी भरण्यासाठी रविवारी जुन्या बसस्थानकापर्यंत भरदुपारी तीव्र उन्हातही रांगा लागलेल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून या जलकुंभावर पाणी भरण्यासाठी रांगा आहेत. टँकरने पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे आणि विकतचे पाणी परवडत नसल्यामुळे सामान्य नागरिक जलकुंभावर तळ ठोकून आहेत. सायकल, रिक्षातूनही पाणी नेले जात आहे.