जिल्हा बँकेतील १० कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: April 1, 2016 01:02 IST2016-04-01T01:00:20+5:302016-04-01T01:02:15+5:30

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शुभमंगल योजना व पीक कर्ज योजनेत आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या बँकेतील १० दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती दिली़

Suspended 10 employees of the District Bank | जिल्हा बँकेतील १० कर्मचारी निलंबित

जिल्हा बँकेतील १० कर्मचारी निलंबित

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शुभमंगल योजना व पीक कर्ज योजनेत आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या बँकेतील १० दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेत दिली़
तसेच पाथरी तालुक्यातील खेर्डा सोसायटीचे चेअरमन व संचालकांविरूद्ध गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती़ त्यास पाटील यांनी उत्तर दिले़ खेर्डा सोसायटीने वाटप केलेल्या शुभमंगल विवाह कर्जयोजनेसह पीक कर्ज वाटपात बनावट सातबारा, लग्नपत्रिका तयार केल्या़ तसेच शेती नसणाऱ्यांच्या नावेही पीक कर्ज उचलले असून, या प्रकरणात खेर्डा येथील विजय सिताफळे यांनी पदाचा दुरुपयोग केला़ त्यांना सोसायटीतील संचालक, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक, निरीक्षक, विभागीय अधिकारी यांनी सहकार्य केले, असा आरोप करीत आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती़
या लक्षवेधीला उत्तर देताना सहकारमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी सांगितले की, सहकारी संस्थेच्या विशेष लेखा परिक्षकांनी या प्रकरणात १६ मार्च रोजी अहवाल सादर केला आहे़ त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता न करता शुभमंगल योजनेंतर्गत कर्ज वाटप झाले आहे़ खेर्डा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, तत्कालीन संचालक, सचिव, जिल्हा बँकेच्या पाथरी शाखेतील तपासणीस, विभागीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांनी कर्ज वाटपात अनियमितता केल्याचे नमूद केले आहे़ त्यामुळे वरील सर्व संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत, असे सहकारमंत्र्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Suspended 10 employees of the District Bank