शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात उन्हाचा पारा कडाडला

By admin | Updated: May 25, 2014 01:09 IST

परभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात २४ मे रोजी जिल्ह्याचा पारा ४३.५ अंशावर पोहोचला. दिवसभरात कडक ऊन पडल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली.

परभणी : यावर्षीच्या उन्हाळ्यात २४ मे रोजी जिल्ह्याचा पारा ४३.५ अंशावर पोहोचला. दिवसभरात कडक ऊन पडल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली झाली. शनिवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. सूर्य जसजसा डोक्यावर येत होता तसतसा उन्हाची तीव्रता वाढत गेली. दुपारनंतर उन्हाचा कडाका अधिकच वाढला होता. या उन्हाळी हंगामात प्रथमच जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च असे ४३.५ अंश नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाने दिली. वाढलेल्या उन्हाचा परिणाम रस्त्यांवरील वाहतुकीवर दिसून आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. चौथा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत नागरिक घराच्या बाहेर पडले नाहीत. शहरातील बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम झाला. बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊन तापले नाही. मे महिन्याच्या मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस झाल्याने ऊन्हाची तीव्रता यावर्षी जाणवली नाही. परंतु सरत्या आठवड्यात ऊन वाढत गेले. आठवडाभरात ४० अंशाच्या खाली पारा उतरलेला नव्हता. त्यात शनिवारी ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली. आगामी काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शनिवारी दिवसभर उकाड्यात मोठी वाढ झाली होती. वातावरणात उकाडा वाढलेला असताना त्यात भर पडली ती विजेच्या भारनियमनाची. वीज गूल झालेली असल्याने उकाड्यामुळे नागरिकांची तगमग होत होती. बाहेर थांबावे तर उन्हाच्या झळा आणि घरात बसावे तर कमालीचा उकाडा, अशा परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त होते. सायंकाळच्या सुमारास शहरात चहेलपहेल वाढू लागली. शहरातील राजगोपालाचारी उद्यान, विद्यापीठ परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली. विशेष करुन उद्यानामध्ये रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी रहात आहे. या आठवड्यात उन्हाचा पारा वाढलेलाच राहिला. तापमान ४० अंशाच्या खाली उतरले नाही. उन्हाळ्याचे आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत. यापुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संपूर्ण उन्हाळ्यात तापमान जेमतेम राहिले. शेवटच्या टप्प्यात ऊन तापू लागले आहे. तापमान जेवढे जास्त वाढेल तेवढा पाऊस जास्त होण्याची शक्यता असते. (प्रतिनिधी)आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून, त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. ऊन वाढत चालल्याने नागरिक दुपारच्या वेळी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. उन्हाचा असर सायंकाळपर्यंत रहात असल्याने दिवसभर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवतो. शनिवारी देखील वाढलेल्या तापमानामुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसून आली. उकाड्यापासून सुटका मिळविण्यासाठी सायंकाळी उद्यानात गर्दी वाढत चालली आहे.