शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

वाळूजमध्ये कंत्राटी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 6:46 PM

कार्तिक बाबासाहेब गंडे हा वाळूज एमआयडीसील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असे.

ठळक मुद्देआई-वडील घरी नसताना कार्तिक याने घराचा दरवाजा आतून लावला.वडिलांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना गळफास घेतल्याचे दिसले

वाळूज महानगर : एका अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज  शनिवार (दि.२०) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वाळूजला उघडकीस आली आहे. कार्तिक बाबासाहेब गंडे (रा.मनिषानगर, वाळूज) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कार्तिक बाबासाहेब गंडे हा वाळूज एमआयडीसील एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. आज शनिवारी आई-वडील घरी नसताना कार्तिक याने घराचा दरवाजा आतून लावला होता. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास कार्तिक याचे वडील बाबासाहेब गंडे हे घरी आले असता त्यांना दरवाजा आतुन बंद असलेल्या दिसून आला. यानंतर बाबासाहेब गंडे यांनी जोर-जोरात दरवाजा ठोठावत कार्तिक यास हाका मारल्या. मात्र आतुन कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने बाबासाहेब गंडे यांनी खिडकीतुन घरात बघितले असता त्यांना कार्तिक हा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसून आला. 

या प्रकारामुळे घाबरलेल्या बाबासाहेब गंडे यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला असता शेजारी नागरिक व पोलिसांनी घटनास्थळ गाठुन कार्तिक याचा गळफास काढुन त्यास खाली उतरविले. यानंतर कार्तिक यास बेशुद्ध आवस्थेत पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केली. यावेळी सहायक उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून कार्तिक याच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. 

टॅग्स :Deathमृत्यूWalujवाळूजAurangabadऔरंगाबाद