एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

By Admin | Updated: August 15, 2014 01:12 IST2014-08-15T01:02:29+5:302014-08-15T01:12:46+5:30

औरंगाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) तर्फे गुरुवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

S.T. Corporation employees' demonstrations | एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

औरंगाबाद : कामगार करार मोडीत काढून २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) तर्फे गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळा आणि विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
औद्योगिक कलह अधिनियम १९४८ मधील तरतुदीनुसार करार मोडीत काढण्यात यावा आणि एम.एस.ई.बी.प्रमाणे २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेसमोर निदर्शनाप्रसंगी संघटनेचे सचिव साहेबराव निकम, कार्याध्यक्ष सुधाकर गायके, कोषाध्यक्ष डी. जी. कातारे, डी. के. राऊत, डी. एच. करजगावकर, व्ही. एल. गायकवाड, कुंदन मलभागे, एच.पी. घानवडकर, जगदीश जाधव, शेख तालेब, आर. के. मोरे, गजानन गायकवाड, जी.डी. निसर्गंध, पी. बी. सुरवाडे, मुजफ्फर शहा, आर. आर. जाधव आदींची उपस्थिती होती.
विभाग नियंत्रक कार्यालयासमोरील निदर्शनावेळी संघटनेचे महाराष्ट्र संघटक सचिव सुरेश जाधव, किरण कल्हापुरे, अशोक म्हस्के आदींची उपस्थिती होती.

Web Title: S.T. Corporation employees' demonstrations