शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या उचलण्याच्या नादात सुसाट टोईंग व्हॅनची दोन कारला धडक, पथकाची नागरिकांनाच अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 20:13 IST

मनपाचे नागरी पथक शिस्त लावण्यासाठी की जीव घेण्यासाठी ? प्रोझोन मॉलसमोरील थरार; माय-लेक थोडक्यात वाचले

छत्रपती संभाजीनगर : गाड्या उचलण्याच्या नादात मनपाच्या टाेईंग व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या नागरिकांच्या अंगावर गाडी घातली. त्यात एक फळविक्रेता गंभीर जखमी झाला तर दोन कारचे नुकसान होत दुचाकीस्वार आई व मुलगा बालंबाल बचावले. विशेष म्हणजे, अपघातानंतरही या नागरी पथकातील माजी सैनिकांनी नेहमीप्रमाणे नागरिकांनाच अरेरावी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गुरुवारी दुपारी ३ वाजता प्रोझोन मॉल मार्गावरील मॉस्को कॉर्नरवर हा अपघात घडला.

शहरातील रस्त्यांच्या कडेला, बेशिस्तपणे उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नागरी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना आहेत. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे हे पथक मॉस्को कॉर्नर ते एपीआय कॉर्नर परिसरात कारवाईसाठी फिरत होते. कार जप्त करून टोईंग व्हॅनचा चालक संतोष पवार गरवारे मैदानाच्या दिशेने भरधाव निघाला. मॉल ओलांडताच त्याचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले व त्याने थेट दुचाकीस्वार फळविक्रेते लक्ष्मण भाऊसाहेब निकम (३६, जय भवानीनगर) यांना उडविले. निकम दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांची सर्व फळे रस्त्यावर फेकली गेली. त्यानंतर व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या दोन कारवर जाऊन धडकली.

नागरिक भयभीत, पळापळया अपघाताचा परिसरात मोठा आवाज झाला. व्हॅन थेट वाहनांना उडवत गेल्याने गाेंधळ उडाला. तेथेच उभ्या शीला दाभाडे व त्यांचा मुलगा अलोक बालंबाल वाचले. घटनेची माहिती कळताच नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बळिराम पांडुरंग पठाडे (एम एच -२० -ईवाय-९१०९), बजरंग नावंदर (एम एच -२० -डीव्ही-६८८६), शीला दाभाडे (एम एच -२० -एचजी २७२४) यांच्या वाहनांचे नुकसान झाले. जखमी लक्ष्मण निकम यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जवानांची नागरिकांवरच दादागिरीअपघातानंतर चूक असतानाही नागरी पथकाने स्थानिकांवरच दादागिरी केली. आवाज चढवून शासकीय कर्मचारी असल्याच्या तोऱ्यात ते गप्प बसण्यासाठी इशारे करत होते. त्यांच्या या मुजोर वागण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मनपाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा वेग सुसाटतीन आठवड्यांपूर्वी मनपाच्या एका सुसाट हायवाचालकाने भडकल गेट परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला चिरडून मारले. त्याच्याच दोन आठवड्यानंतर मुकुंदवाडीत मनपाच्या हायवाने दुचाकीस्वाराला चिरडले होते. त्यामुळे मनपाच्या या मुजोर कर्मचाऱ्यांना आवर कोण घालणार, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.

अधिकारावरून पुन्हा प्रश्नचिन्हनागरी पथकाकडून बेकायदेशीर पार्किंगच्या नावाखाली दुचाकी, चारचाकी जप्त केल्या जातात. टोईंग व्हॅनला अंबर दिवा लावून कार ओढून नेतात. प्रत्यक्षात कायद्यानुसार या पथकाला असा कुठलाही अधिकार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही नागरी पथकाकडून वाहने जप्त करून दामदुप्पट दंड वसूल करून नागरिकांना उद्धट भाषा वापरली जाते. त्यांच्या या वागणुकीवरूनही सामान्यांमधून सातत्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Towing van crashes, injures vendor; citizens allege arrogance from towing team.

Web Summary : A speeding towing van in Chhatrapati Sambhajinagar collided with cars, injuring a fruit vendor. Locals accuse the towing team of arrogance post-accident. Earlier incidents involving municipal vehicles have sparked public outrage.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात