ग्रामपंचायतस्तरावर सॉफ्टवेअर नोंदी अर्धवट

By Admin | Updated: May 23, 2014 01:12 IST2014-05-23T00:35:58+5:302014-05-23T01:12:02+5:30

नांदेड: ग्रामपंचायतस्तरावरील अद्यावत नोंदी विविध सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्यानंतर मागील महिण्याभरापासून या कार्यक्रमाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे़

Software logs at the Gram Panchayat partially | ग्रामपंचायतस्तरावर सॉफ्टवेअर नोंदी अर्धवट

ग्रामपंचायतस्तरावर सॉफ्टवेअर नोंदी अर्धवट

 नांदेड: ग्रामपंचायतस्तरावरील अद्यावत नोंदी विविध सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्यानंतर मागील महिण्याभरापासून या कार्यक्रमाला गती देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे़ परंतु अद्याप हे काम पूर्ण झाले नाही़ त्यामुळे ३१ मे अखेर सॉफ्टवेअरमध्ये नोंदी पूर्ण करण्याच्या सूचना ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यू़ ए़ कोमवाड यांनी गट विकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत़ ग्रामपंचायत स्तरावरील माहिती प्रिया सॉफ्ट व संग्राम तसेच इतर अकरा सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करणे अपेक्षित आहे़ यात सर्व्हीस प्लस, अ‍ॅक्शन सॉफ्ट सोशल आॅडीट, नॅशनल पंचायत पोर्टल, पॅन प्लस अशा विविध सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करावयाच्या आहेत़२१ एप्रिल पासून दर आठ दिवसाला या विभागाचे प्रधान सचिव यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत आहेत़ ज्या जिल्ह्यात कमी काम आहे अशा गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत़ परंतु कामात प्रगती होईल या आशेवर अद्यापही कोणत्याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही़ परंतु २१ मे रोजी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख व गट विकास अधिकार्‍यांच्या मासिक आढावा बैठकीत काम कमी असणार्‍या जिल्ह्यातील ४ गट विकास अधिकारी यांना गांधीगिरी पद्धतीने बुके देवून सत्कार करण्यात आला होता़ या सॉफ्टवेअरमध्ये १ ते ३३ नमुना नोंद वहितील अहवाल अपडेट करावयाचे आहेत़ तसेच जन्म व मृत्युच्या नोंदी व त्याचे प्रामाणिकरण करावयाचे आहे़ १२ मे रोजी नोंदणीच्या प्रमाणिकरणाचे काम ४४ टक्के होते़ ते आज ८१ टक्के एवढे झाले आहे़ या सॉफ्टवेअरमध्ये ५ लाख १९ हजार १६ नोंदी करण्यात आल्या आहेत़ त्या तुलनेत प्रमाणिकरणाची टक्केवारी जरी जास्त दिसत असली तरी नांदेड जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात १२ ते १५ लाखापर्यंत नोंदी करणे अपेक्षित असून हे काम प्रगतीपथावर आहे़ (प्रतिनिधी) ज्या ग्रामपंचायतीचे काम २५ टक्केपेक्षा कमी आहे, अशा ग्रामसेवकांना निलंबीत करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आहे़ परंतु याबाबत गट विकास अधिकारी यांचे काय म्हणणे आहे हे ऐकूणच पुढील कारवाइृ करण्यात येणार असल्याचे समजते़ ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव हे दर आठवड्याला राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला जात आहे़ राज्यात नांदेड जिल्हा ३१ व्या क्रमांकावर असून अद्याप कारवाई करण्यात आली नाही़ परंतु ३१ मे पर्यंत काम पूर्ण न करणार्‍या ग्रामसेवकावर मात्र कारवाईस सामोरे जावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्र पत्र पाठवून काम पूर्ण करण्याविषयी सांगितले आहे़

Web Title: Software logs at the Gram Panchayat partially