शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या थप्पीने त्वचेचे आजार; कमी भावात तरी कसा विकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 11:50 IST

लग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षीप्रमाणे आताही कापसाचे दर वाढले नाहीत. कापसाच्या दरवाढीची आशा मावळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने मागील चार महिन्यांपासून घरात कोंबून ठेवलेल्या कापसातील पिसवा, अळी आणि अन्य कीटकांमुळे शेतकऱ्यांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या अंगावर पुरळ येत आहे तर काहींच्या संपूर्ण शरीराला खाज येते.

दोन रूमचे घर; एक खोली कापसाने पॅकग्रामीण भागातील प्रत्येक गावात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे केवळ दोन रूमचे घर असते. यातील एका खोलीत ते कापूस ठेवतात तर दुसऱ्या खोलीत संसारोपयोगी साहित्य ठेवतात. कापसाने पॅक झालेल्या खोलीत शेतकऱ्यांना झोपावे लागते.

उंदीर अन् विस्तवाचा धोकाघरात कोंबून ठेवलेल्या कापसाला आग आणि उंदरांचा धोका असतो. यामुळे या दोन्हींपासून कापसाचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

भाव ७ हजारांच्या पुढे सरकला नाहीजिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामातील कापसाचे क्षेत्र ७५ टक्क्यांवर असते. गतवर्षी ७ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर कापसाला मिळाला नाही. यंदाही कापसाचा दर ७ हजारांच्या पुढे सरकलाच नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

अंगाला खाज; बालके हैराणकापसाच्या थप्पीवर प्राण्याच्या अंगावर असतात तशा पिसवा, अन्य बारीक किडे असतात. हे किडे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना चावतात. यामुळे अंगाला खाज येणे, पुरळ येण्याचा प्रकार होतो.

कापसाने संक्रांत आणलीकापसाचा सिझन सुरू झाला तेव्हापासून कापसाचा दर ७ हजारांपर्यंतच आहे. संक्रांतीनंतर कापसाचे दर वाढतील, या आशेपोटी मागील चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी घरात कापूस कोंबून ठेवला होता. मात्र, कापसावरच संक्रांत आल्याचे दिसून येते.

लग्नसराईने चणचण, आता विकावाच लागणारलग्नसराई सुरू झाल्याने शेतकऱ्यांना खर्चासाठी कापूस विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवाय कापसाचा दर वाढत नसल्याने गतवर्षी वर्षभर कापूस सांभाळून काही लाभ झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी आता कापसाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

कापूस विकण्याचा निर्णय कापसाचे दर वाढतील या आशेपोटी आम्ही घरात कापूस कोंबून ठेवला आहे. आता या कापसातील किडे रोज चावतात. यामुळे कापूस विकण्याचा निर्णय घेतला.- रामदास पाटील, शेतकरी

सध्या तरी ७ हजारांपर्यंतच दरसीसीआयचा दर ७ हजारपर्यंतच आहे. शिवाय खासगी जिनिंगवर कापूस याच दराने खरेदी केला जातो. यामुळे आम्ही शेतकऱ्यांकडून ६८०० ते ७००० रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी करतो.- लक्ष्मणराव जाधव, व्यापारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीcottonकापूस