शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईची स्थिती

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली

बिडकीन : मराठवाड्यातील ६५ तालुक्यांत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून निसर्गाने साथ दिली नसली तरी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहील. शेतकऱ्यांनी हादरून जाऊ नये, असा दिलासा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी बिडकीन व आवडे उंचेगाव येथे झालेल्या जाहीर सभेतून दिला.बिडकीन येथील १८.७० कोटी रुपयांच्या बिडकीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहतीचे व बिडकीन पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आर.आर. पाटील यांच्या हस्ते बिडकीन येथे दुपारी १ वाजता करण्यात आले. दुपारी ४ वाजता आवडे उंचेगाव येथील महावितरणच्या ३३ केव्हीए सबस्टेशनचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार संजय वाघचौरे, कदीर मौलाना, हरिश्चंद्र लघाने पाटील, आप्पासाहेब पाटील, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे, रवींद्र शिसोदे, रामगोपाल धूत, कैलास धर्मे, अप्पासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे, अजय डिघुळे, अनिल घोडके, मनोहर एरंडे, हर्षवर्धन तुपे, विलास शेळके, रंजना कडू पाटील, युसूफ पठाण, मुन्ना मिर्झा, लतीफ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना आमदार संजय वाघचौरे यांनी बिडकीन येथील शेतकऱ्यांना २३ लाख रुपये एकर भाव मिळवून दिला. बिडकीनच्या पाणीपुरवठ्याचा शब्द दिला होता, तो पाळला. कायमस्वरूपी दुष्काळी भागासाठी २२२ कोटी रुपयांची योजना मार्गी लावली. आज १०० कोटी रुपये या योजनेवर खर्च झालेले आहेत. विविध धर्माच्या व समाजाच्या नागरिकांसाठी ८०० सामाजिक सभागृह बांधले. आमच्या विरोधकांनी २५ वर्षांत काहीच केले नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विकासकामांचा प्रचार करून विरोधकांचे तोंड बंद करावे, असे आवाहन केले.यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मार्गदर्शन करताना शिवसेना व भाजपाचा आपल्या शैलीत समाचार घेताना दिल्लीतील सरकार हे मोदींचे नसून ते उद्योगपतींचे आहे. देशात महागाई कमी करणार असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तीन महिन्यांत १५ टक्के महागाईत वाढ केली. उद्योगपतींच्या मालाची किंमत वाढत आहे, तर शेतकऱ्यांच्या मालाची किंमत वाढू नये म्हणून मोदी सरकार काळजी घेत आहे. पेट्रोल, डिझेल, सिमेंट, खते आदींची भाववाढ झाली. मात्र कांद्याची किंमत वाढताच सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तू करून कांदा निर्यातीस बंदी केली, त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही.