शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ जलतरण तलावाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:06 IST

सर्वसामान्य नागरिक व बाळगोपाळांसाठी असणाºया महानगरपालिकेच्या सिद्धार्थ स्विमिंगपूलने अवघ्या ११ महिन्यांतच ५४ लाख २0 हजार इतका उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाला अद्यापही एक माहिना बाकी आहे. त्यामुळे हे उत्पन्न ६0 लाखांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. हा उत्पन्नाचा उंचाक महानगरपालिकेला १७ पेक्षा जास्त वर्षांत कधीही गाठता आला नाही.


जयंत कुलकर्णी ।
औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिक व बाळगोपाळांसाठी असणाºया महानगरपालिकेच्या सिद्धार्थ स्विमिंगपूलने अवघ्या ११ महिन्यांतच ५४ लाख २0 हजार इतका उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाला अद्यापही एक माहिना बाकी आहे. त्यामुळे हे उत्पन्न ६0 लाखांपेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. हा उत्पन्नाचा उंचाक महानगरपालिकेला १७ पेक्षा जास्त वर्षांत कधीही गाठता आला नाही.
औरंगाबाद शहरात अनेक खाजगी जलतरण तलाव आहेत; परंतु सर्वसामान्य नागरिकांना खिशाला परवडू शकणारा आणि जलतरणाचा निखळ आनंद घेता येऊ शकेल तो महानगरपालिकेचा सिद्धार्थ जलतरण तलाव आहे. त्यामुळे उन्हाळा आला की, सर्वात जास्त नागरिक, खेळाडू आणि बाळगोपाळांचा सर्वाधिक ओढा हा मनपाच्या सिद्धार्थ जलतरण तलावाकडे असतो. सर्वसाधारणपणे खाजगी जलतरण तलावावर ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत महिन्यासाठी पैसे मोजावे लागतात. मात्र, सिद्धार्थ जलतरण तलावावर स्विमिंगचा आनंद १,२00 रुपयांत घेता येऊ शकतो. त्याचप्रमाणे खाजगी जलतरण तलावात विहीर आणि बोअरिंगचे पाणी वापरले जाते, तर सिद्धार्थ जलतरण तलावावर पैठण येथील जायकवाडी धरणाचे गोडे व शुद्ध पाणी वापरले जाते. साडेतीन एकरांत असणाºया सिद्धार्थ जलतरण तलावाचीही पाण्याची क्षमता ४0 लाख आहे आणि जायकवाडी धरणाचे शुद्ध पाणी हेच स्विमिंगपूलमध्ये फिल्टर करून ते पुन्हा वापरले जाते. सध्या या जलतरण तलावावर एकूण आजीव सभासद २५५ असून, वार्षिक सभासद २७४ आहेत. त्रिमासिक सभासद २९ असून, कौटुंबिक सभासद १७ आहेत व मासिक सभासद ४0, असे एकूण ६१५ सभासद आहेत.
या जलतरण तलावाच्या उत्पन्नाचा आलेख गेल्या काही वर्षांत, तर खूपच उंचावत आहे. रावसाहेब मालोदे हे व्यवस्थापक असताना १ एप्रिल २000 ते ३१ मार्च २00१ यादरम्यान जलतरणिकेचे उत्पन्न १३ लाख ६५ हजार ५२५ रुपये होते. त्यांच्या काळात २00९ पर्यंत उत्पन्न २ लाख ८१ हजारांपर्यंत होते; परंतु उत्पन्नाचा खरा ग्राफ अभय देशमुख यांनी व्यवस्थापकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उंचावला. १ एप्रिल २0१0 ते ३१ मार्च २0१११ दरम्यान हे उत्पन्न २१ लाख ४१ हजारांपर्यंत वाढले आणि त्यात सात्यत्याने वाढच होत गेली. २0१३ आणि २0१४ मध्ये दुरुस्तीनिमित्त मनपाचा हा जलतरण तलाव बंद होता; परंतु त्यानंतरच्या दोन वर्षांत या जलतरण तलावााचे उत्पन्न अनुक्रमे ४७ व ४२ लाखांपर्यंत गेले होते. पाण्याच्या अभावामुळे मात्र १ एप्रिल ते २0१६ व ३१ मार्च २0१७ यादरम्यान मनपाला फक्त ९ लाख ४५ हजार ७७५ इतकेच उत्पन्न झाले; परंतु याची अनेक पटीत भरपाई १ एप्रिल ते आजतागायत झाली आहे.
सिद्धार्थ जलतरण तलावाच्या उत्पन्नाविषयी व्यवस्थापक अभय देशमुख यांनी सांगितले की, मनपाच्या पदाधिकाºयांचे मार्गदर्शन, अधिकाºयांचे तांत्रिक साह्य आणि स्विमिंगपुलावरील कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे उत्पन्नाचा उच्चांक आम्ही गाठू शकलो.

सुरक्षारक्षकच नाही
विशेष म्हणजे उत्पन्नाचा उच्चांक गाठला असला तरी दुर्दैवी बाब म्हणजे मनपाला आर्थिक फायदा मिळवणाºया जलतरण तलावावर सुरक्षारक्षकच नाही.
आता उन्हाळा असल्यामुळे या नेहमीप्रमाणेच स्विमिंगपूलवर खूप गर्दी होणार आहे.
सुरक्षारक्षक नसल्यामुळे गर्दीला आळा घालणे तसेच फुकट्यांना रोखणे हे स्विमिंगपूल येथील कर्मचाºयांच्या हाताबाहेरचे काम असणार आहे.