शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनोदाच्या माध्यमातून उलगडले गांभीर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:29 IST

डॉक्टरी व्यवसायातील भेडसावणाºया विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ ही एकांकिका रविवारी सायंकाळी ‘रंगकर्मी’ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सादर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉक्टरकी हा पेशाच असा आहे की त्याभोवती कायम एक आकर्षणाचे वलय असते; मात्र ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...’ या उक्तीनुसार जेव्हा आपण स्वत: किं वा आपल्या अगदी जवळची एखादी व्यक्ती या पेशात जाते तेव्हाच या व्यवसायाची वास्तविकता समजते आणि आकर्षणाचे एकेक वर्तुळ गळून पडू लागते. डॉक्टरी व्यवसायातील भेडसावणाºया विविध प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारी ‘डॉक्टर मुलगा नको गं बाई’ ही एकांकिका रविवारी सायंकाळी ‘रंगकर्मी’ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सादर करण्यात आली. यामध्ये विनोदाच्या माध्यमातून वैद्यकीय पेशातील अनेक समस्या उलगडून दाखविण्यात आल्या.डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटिकेने डॉक्टरांना खळखळून तर हसविले; मात्र त्याचबरोबर या व्यवसायाला आलेल्या गंभीरतेची जाणीवही नकळतपणे करून देऊन उपस्थितांना विचारमग्न केले. डॉ. अमोल देशमुख, डॉ. मंजिरी देशमुख, डॉ. वैशाली लोखंडे-उणे, डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. संदीप मुळे, डॉ. आनंद देशमुख, डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. विक्रम लोखंडे आणि डॉ. कडेठाणकर यांच्या अभिनयाने रंगलेल्या या नाटिकेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. एकांकिकेला डॉ. विशाल चौधरी यांचे संगीत मिळाले. रवी कुलकर्णी यांनी नेपथ्य व वेशभूषेची जबाबदारी सांभाळली. डॉ. उज्ज्वला दहीफळे यांनी संचालन केले.