निधी संपविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

By Admin | Updated: April 1, 2016 01:02 IST2016-04-01T01:01:02+5:302016-04-01T01:02:42+5:30

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर लेखा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ पहावयास मिळाली़ आर्थिक वर्षाचा शेवटचा लेखाजोखा जुळविण्यात अधिकारी मग्न होते़

Running officers to finish the fund | निधी संपविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

निधी संपविण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये गुरुवारी मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर लेखा विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ पहावयास मिळाली़ आर्थिक वर्षाचा शेवटचा लेखाजोखा जुळविण्यात अधिकारी मग्न होते़ तर निधी खर्चासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयाशी अधिकाऱ्यांचा संपर्क सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले़
जिल्ह्याच्या विकास कामांसाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचा ताळमेळ वर्षाअखेरीस लावला जातो़ हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता असल्याने ३१ मार्च रोजी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये आकडेमोडीचा खेळ सुरू असतो़ तो यावेळेसही पहावयास मिळाला़ आॅनलाईन प्रणाली विकसित झाल्याने दोन वर्षांपासून बिले आणि दप्तर घेऊन खर्च मंजूर करण्यासाठी होणारी धावपळ यावेळेस दिसली नसली तरी कोषागार कार्यालयाकडे आॅनलाईन बिले टाकण्यासाठी अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कामात होते. सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचा राबता होता़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ही आर्थिक विकासाची नाडी असलेली कार्यालये रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील आर्थिक लेखे कोषागार कार्यालयातून मंजूर होतात़ यावर्षी ३० मार्च रोजीच बहुतांश बिले काढण्यात आली आहेत़ ३१ मार्च रोजी शासकीय कार्यालयाकडून आॅनलाईन येणाऱ्या बिलांना मंजुरी देण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Running officers to finish the fund