शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी धावले डॉक्टर

By admin | Updated: May 26, 2014 00:58 IST

परभणी : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने बस उलटून सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़

परभणी : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने बस उलटून सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़ या जखमींना एका वाहनामधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले़ त्यावेळी डॉक्टर व परिचारिकांची एकच धावपळ उडाली़ काही मिनिटांमध्येच डॉक्टर व परिचारिकांचा ताफा मदतीसाठी धावून आल्याने रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळाला़ रविवार असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्य विभाग बंद असतो़ तसेच रुग्णांची संख्या तोकडी असते़ त्यातच दैठणा गावाजवळ वºहाडाला घेऊन जाणारी लक्झरी बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटल्याने ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दुपारी ४ वाजता एका वाहनामधून आणले़ एकाच वेळी एवढे जखमी आणल्याने अपघात विभागात असलेल्या डॉक्टर व परिचारकांची एकच तारांबळ उडाली़ या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्यानंतर काही मिनिटांमध्येच प्रभारी जिल्हा चिकित्सक प्रकाश डाके यांच्यासह डॉक्टर व परिचारिकांचा ताफा अपघात विभागात दाखल होऊन जखमींवर तत्काळ उपचार झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला़ तसेच प्रभाकर वाघीकर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोरी येथून थेट जिल्हा रुग्णालयात आले़ त्यांनी रुग्ण व नातेवाईकांना मदत केली़ तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हेही आपल्या पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यामुळे गर्दीवर नियंत्रण करण्यात आल्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे झाले़ जखमींना पाहण्यासाठी नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती़ यामुळे रुग्णालय परिसराला गर्दीचे स्वरुप आले होते़ (प्रतिनिधी)वºहाडाच्या अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके यांना मिळाली़ त्यानंतर डॉ़ डाके यांनी स्वत: रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले, तसेच डॉक्टर व परिचारिकांचा ताफा बोलावून घेतला़ एकाच वेळी ३० ते ३५ जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आल्यामुळे डॉक्टर व परिचारिकांची एकच धांदल उडाली़घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही मिनिटांमध्येच डॉक्टर उपलब्ध झाले व जखमींवर उपचार केले़ यावेळी डॉक्टर अमोल भालेराव, डॉ़ जफर, डॉ़ काळे, डॉ़ रणवीर, डॉ़ किरण नागोली, डॉ़ दिनकर पाटील यांच्यासह परिचारिका शीला कुलकर्णी, अलका आखाडे, रत्नपारखे, बावनकर, बोराडे, बोथीकर, सोनटक्के यांच्यासह कर्मचार्‍यांनीही परिश्रम घेतले़ प्रभाकर वाघीकर यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरी येथून काही वेळामध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल झाले व वाघीकर यांनी रुग्णालयात नातेवाईकांची होणारी गर्दी आटोक्यात आणून रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत केली तसेच जखमी रुग्णांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकांची तत्काळ व्यवस्था केली़ त्यामुळे प्रभाकर वाघीकर यांच्या माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले़ त्यांच्या उपस्थितीमुळे रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार मिळाला़ दैठणा गावाजवळ लग्नाचे वºहाड घेऊन जाणार्‍या वाहनाला अपघात झाल्याची माहिती परभणी पोलिसांना समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हे दाखल झाले़ त्यांच्यासह पोलिस कर्मचारी आल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोपे झाले़ रुग्णालयाच्या परिसरात पोलिस व जखमींच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती़ गंभीर जखमींना नांदेड येथे हलविण्यासाठी रुग्णालयाच्या वतीने तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या़ त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत होते़