शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंठा येथील आठवडी बाजार घाणीच्या विळख्यात

By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST

मंठा : तालुक्याच्या आठवडी बाजाराचा नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात आहे. बैल आणि भुसाराची खरेदी विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणावर होते.


मंठा : तालुक्याच्या आठवडी बाजाराचा नावलौकिक संपूर्ण मराठवाड्यात आहे. बैल आणि भुसाराची खरेदी विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु हा आठवडी बाजार घाणीच्या विळख्यात सापडला आहे. या घाणीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. तर ग्राहकांनाही चिखल तुडवतच बाजारात जाऊन भाजीपाला व अन्य वस्तू खरेदी करण्याची वेळ आल्याने नागरिकांत तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
मंठा शहरालगत असलेला आठवडी बाजार अधिकृत बांधकामांबरोबरच आता घाणीच्या विळख्यात सापडल्याने महिला , पुरूषांना चिखलातूनच पायपीट करावी लागते. तर व्यापाऱ्यांनाही आपले भाजीपाला, कापड, किराणा, हॉटेल या व्यवसायांसाठी चिखलालगतच दुकान थाटून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. या आठवडी बाजाराच्या अगोदर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र घाण आणि चिखल झाला. शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या हर्राशीपोटी नगर पंचायतला लाखो रुपये मिळतात. परंतु रस्त्यावर अथवा बाजारात मुरूम टाकून घाण घालविण्यासाठी नगरपंचायत उदासीन असल्याचे चित्र आहे. आठवडी बाजारात चिखलामुळे रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. अनेक वृद्ध नागरिक बाजारकरू बाजार करताना पाय घसरल्याच्या घटना घडत आहेत. या गंभीर समस्येकडे नगर पंचायतने लक्ष देणे गरजेचे आहे.