"पनीर दुधाचे, तर ॲनालॉग तेलाचे!" हॉटेल मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेखाची सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 12:08 IST2026-05-09T12:07:27+5:302026-05-09T12:08:19+5:30

हॉटेल मेन्यू कार्डवर आता सत्य सांगावेच लागणार;  स्वस्त 'ॲनालॉग' खपवणाऱ्या हॉटेल्सवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर, एफडीएला  तपासणीचे आदेश.

Real Paneer or Oil-Based Analogue? Mandatory Disclosure on Hotel Menus Ordered in Chhatrapati Sambhajinagar | "पनीर दुधाचे, तर ॲनालॉग तेलाचे!" हॉटेल मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेखाची सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

"पनीर दुधाचे, तर ॲनालॉग तेलाचे!" हॉटेल मेन्यू कार्डवर स्पष्ट उल्लेखाची सक्ती; जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन अन्नपदार्थ वेगवेगळे असून दोन्हीमध्ये वेगवेगळी पोषणमूल्ये आहेत. याची ग्राहकांना स्पष्ट कल्पना यावी, यासाठी हॉटेलचालकांना मेन्यू कार्डवर तसा स्वतंत्र उल्लेख करण्याची सक्ती केली आहे. जे हॉटेल्स व अन्न व्यावसायिक या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.

रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते अन्नपदार्थ तयार करताना त्यात पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करतात. पनीर दुधापासून तयार होते, तर चीज ॲनालॉग खाद्यतेल, स्टार्च आणि फूड ॲडिटिव्हचा वापर करून तयार केले जाते. चीज ॲनालॉगच्या उत्पादन, विक्री किंवा वापराला बंदी नाही; मात्र जे ग्राहक हा पदार्थ अन्न म्हणून ग्रहण करतात, त्यांना हा पदार्थ खाण्यापूर्वी त्यातील घटकांची माहिती असणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त चीज ॲनालॉग वापरून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. हॉटेल्स, केटरर्स, रेस्टॉरंट्स व अन्न व्यावसायिकांच्या तपासणी आणि कारवाईसाठी एफडीएच्या पथकाला जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत.

पनीर काय आहे?
निर्मिती : हे दूध गरम करून त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर (आम्ल) घालून तयार केले जाते.
पोषण : हे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.
वैशिष्ट्य : हे चवीला सौम्य असते आणि शिजवताना वितळत नाही.

चीज ॲनालॉग काय आहे?
निर्मिती : हे दुधापासून न बनता वनस्पती तेल (उदा. पाम ऑइल), स्टार्च, इमल्सीफायर आणि दुधाचे घन पदार्थ किंवा नॉन-डेअरी प्रथिनांपासून बनवले जाते.
वैशिष्ट्य : हे दिसायला आणि चवीला हुबेहूब पनीरसारखे असते.
फरक : यात पौष्टिकता कमी असते आणि पचनास कठीण असू शकते.

कसा ओळखावा फरक?
कमी किंमत : चीज ॲनालॉगची किंमत खऱ्या पनीरपेक्षा तुलनेने कमी असते.
चव : शिजवल्यानंतर रबरासारखे किंवा खूप मऊ लागते.
तेल : हे गरम केल्यावर त्यातून तेल वेगळे सुटते.
आयोडिन टेस्ट : यावर आयोडिनचे थेंब टाकल्यास ते निळ्या रंगाचे दिसते, कारण त्यात स्टार्च असते.

Web Title : पनीर और एनालॉग चीज़ में अंतर मेनू पर स्पष्ट करें: कलेक्टर की चेतावनी!

Web Summary : होटलों को मेनू पर पनीर और एनालॉग चीज़ के बीच स्पष्ट रूप से अंतर करना होगा, जैसा कि जिला कलेक्टर के आदेश में है। तेल और स्टार्च से बनी एनालॉग चीज़ अक्सर पनीर की जगह इस्तेमाल होती है, जो उपभोक्ताओं को गुमराह करती है। उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी। अपनी चीज़ को जानें!

Web Title : Clarify Paneer vs. Analog Cheese on Menus, Warns Collector!

Web Summary : Hotels must clearly distinguish paneer from cheese analog on menus, as per district collector's order. Analog cheese, made from oil and starch, often replaces paneer, misleading consumers. Violators face strict action. Know your cheese!