शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

साथरोगाच्या नियंत्रणासाठी ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:07 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात साथरोगाच्या नियंत्रणासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे. सध्या दोन-तीन ठिकाणी जवळपास १०० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असली तरी बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली. पावसाळ्यात साथरोगाचा फैलाव झपाट्याने होत असतो, हे गृहीत धरून प्रशासनाने जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘रॅपीड फोर्स टीम’ तैनात करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सहायिकांचा समावेश आहे. याशिवाय आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा (मेडिसीन कीट) ठेवण्यात आलेला आहे. गेल्या तीन दिवसांत सोयगाव तालुक्यातील ठाणा या गावामध्ये जवळपास शंभराहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. ही घटना समजताच नजीकच्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ‘रॅपीड फोर्स टीम’ रात्रीतूनच ठाणा गावाकडे रवाना झाल्या. त्या गावातील जि.प. शाळांमध्ये तात्काळ कॅम्प सुरू केला असून तेथेच बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर जरंडी व सोयगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जवळपास २० ते ३० अत्यवस्थ रुग्णांना हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारली असून त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आल्याचे डॉ. खतगावकर यांनी सांगितले. गंगापूर तालुक्यातील मेहंदीपूर आणि ठाणा या दोन्ही गावांमध्ये नागरिकांनी दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. शनिवारी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी ठाणा गावात जाऊन रुग्णांना भेट दिली.