शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला सिडकोत जोरदार प्रतिसाद

By admin | Updated: October 6, 2014 00:43 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला रविवारी सिडकोतील अयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, गणेशनगर, एन-७, एन-८ भागांत जोरदार प्रतिसाद मिळाला.

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला रविवारी सिडकोतील अयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, गणेशनगर, एन-७, एन-८ भागांत जोरदार प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. एन-७ भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने पदयात्रा मोठ्या उत्साहात पुढे निघाली.इंदिरा मार्केट, ग्रिव्हज कॉलनी, गिडोर कॉलनी, त्रिवेणीनगर भागात पदयात्रा पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. पदयात्रा अयोध्यानगर भागात पोहोचल्यानंतर मुकु ल मंदिर शाळेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.अयोध्यानगर भागातील प्रत्येक गल्लीत पदयात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. अनेक महिलांनी आपल्या दारात रांगोळी काढून पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रा बजरंग चौकात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांनी राजेंद्र दर्डा यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. बजरंग चौक ते जळगाव रोडदरम्यान पदयात्रेत ‘राजेंद्र बाबूजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याने संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. देवगिरी बँकेच्या पाठीमागील भागात श्री हौसिंग सोसायटी, सुयोग हौसिंग सोसायटी, विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, कीर्ती हौसिंग सोसायटी, सद्गुरू हौसिंग सोसायटी भागात पदयात्रेद्वारे मतदानाचे आवाहन करण्यात आले. एन-७ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत काशीनाथ कोकाटे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. विमल मापारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.डीएमआयसीतून औरंगाबादचा विकासपदयात्रेच्या समारोपप्रसंगी काशीनाथ कोकाटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांनी उद्योगमंत्री असताना डीएमआयसी हा औद्योगिक प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आणला. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भूमिगत गटार योजना असेल, समांतर जलवाहिनी असेल या महानगरपालिकेच्या योजनांसाठीही केंद्रातून निधी मंजूर करण्यात राजेंद्र दर्डा यांचा सिंहाचा वाटा आहे. औरंगाबाद शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजेंद्र दर्डा यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राजेंद्र दर्डा यांना सिडकोतून मोठ्या प्रमाणात लीड देण्याचे आपले कर्तव्य असल्याचे आवाहन काशीनाथ कोकाटे यांनी उपस्थितांना केले. ४कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:ला उमेदवार समजून काम करावे. आता कुणाचीच हवा नाही, हवा असेल तर ती फक्त काँग्रेसचीच. कुठलाही गटतट न बाळगता एकदिलाने काम करा, विजय आपलाच आहे, असा विश्वास आ. दर्डा यांनी व्यक्त केला.