स्पाच्या नावाखाली अश्लील चाळे! पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून उघड केला काळा धंदा; मालक व व्यवस्थापकासह ३ ग्राहकांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:13 IST2026-05-07T19:13:22+5:302026-05-07T19:13:44+5:30

'हरियाणा, पश्चिम बंगालमधून आणल्या होत्या महिला!' छ. संभाजीनगरमधील विनापरवाना स्पा सेंटरवर पोलिसांचा मोठा प्रहार.

Raid on Illegal Spa Center in Chhatrapati Sambhajinagar; 5 Booked for Obscene Acts at 7 Apple Hotel | स्पाच्या नावाखाली अश्लील चाळे! पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून उघड केला काळा धंदा; मालक व व्यवस्थापकासह ३ ग्राहकांवर गुन्हे

स्पाच्या नावाखाली अश्लील चाळे! पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून उघड केला काळा धंदा; मालक व व्यवस्थापकासह ३ ग्राहकांवर गुन्हे

छत्रपती संभाजीनगर : शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय आणि अश्लील चाळे सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हडको कॉर्नर परिसरातील ७ ॲपल हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या सेव्हन्थ सेन्स स्पा अँड ब्यूटी सेंटरवर सिटी चौक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास छापा मारला. त्यात चार महिलांची सुटका करून पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींमध्ये स्पा मालक सनी अशोक मनोरे, व्यवस्थापक सारिका नाना मरळ (रा. दत्तवाडी, पुणे) यांच्यासह ग्राहक प्रकाश रमेश केसभट (रा. देवळाई), मगाराम पुनाराम सुथार (रा. आलोकनगर, बीड बायपास) आणि देवीदास हरिभाऊ पाडसवान (रा. नारळीबाग) या पाच जणांचा समावेश आहे. पोलिस अंमलदार प्रवीण टेकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उपनिरीक्षक संजय राठोड यांना सेव्हन ॲपल हॉटेलमध्ये स्पाच्या नावाखाली अवैध व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीची खात्री करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या सूचनेनुसार, पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, एपीआय मनीषा हिवराळे यांच्या पथकाने सोमवारी रात्री एका बनावट ग्राहकाला ५ हजार रुपये देऊन या स्पा सेंटरमध्ये पाठवले. तेथील कॅश काउंटरवर असलेल्या महिला व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता, तिने टाळाटाळ केली. त्यानंतर पोलिसांनी थेट आतमध्ये छापा मारला. स्पा सेंटरची झडती घेतली असता, तिथे मसाज करण्यासाठी पश्चिम बंगाल आणि हरियाणा येथून आणलेल्या चार महिला सापडल्या. तसेच, काउंटरसमोर तीन ग्राहक बसलेले आढळले. पीडित महिलांची चौकशी केली असता ग्राहक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करतात, असे समजले. पकडलेल्या आरोपींनी त्यांच्याशी अश्लील प्रकार केल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

अनधिकृतपणे चालत होता स्पा
७ ॲपल हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर सेव्हन्थ सेन्स स्पा ॲण्ड ब्यूटी सेंटरकडे स्पा चालविण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले. अधिक तपास पोलिस हवालदार मुनीर पठाण करत आहेत.

Web Title : स्पा में अश्लील हरकतें: पुलिस छापे में भंडाफोड़, गिरफ्तारियां

Web Summary : संभाजीनगर में एक स्पा पर अवैध कारोबार चलाने के आरोप में छापा मारा गया। पुलिस ने स्पा की आड़ में अश्लील हरकतें होने का खुलासा होने के बाद मालिक और प्रबंधक सहित पांच लोगों को गिरफ्तार किया और चार महिलाओं को बचाया।

Web Title : Spa Racket Busted: Police Raid Uncovers Obscene Acts, Arrests Made

Web Summary : A spa in Sambhajinagar was raided for running an illegal business. Police rescued four women and arrested five, including the owner and manager, after a sting operation revealed obscene acts were taking place under the guise of spa services.