शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

'भाजप नगरसेवकांच्या मालमत्ताही अनधिकृत'; पुराव्यासह इम्तियाज जलील मनपा आयुक्तांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:22 IST

इम्तियाज जलील यांनी पुराव्यांचा पाढाच वाचला; आयुक्तांची 'कोणालाही सोडणार नाही' अशी ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : शहरात भाजप नगरसेवकांच्याही अनधिकृत मालमत्ता आहेत. त्यांच्याही तक्रारी मार्च महिन्यातच महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का करण्यात आली नाही? त्यांच्या अनधिकृत बांधकामांचे पुरावे सादर करण्यासाठी बुधवारी दुपारी एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील मनपात दाखल झाले. त्यांनी सर्व पुरावे, तक्रारी आयुक्त अमोल येडगे यांना सादर केल्या. या तक्रारींची अतिक्रमण, नगररचना विभागाकडून शहानिशा केली जाईल, दोषी आढळून आल्यास निश्चित कारवाई केली जाईल, कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

नारेगाव येथे एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या तीन मालमत्ता जमीनदोस्त केल्यानंतर दुपारी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील महापालिका मुख्यालयात दाखल झाले. सोबत पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जलील यांनी आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांच्या मालमत्ताही अनधिकृत आहेत. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी दिलेले कागदपत्रे, अहवाल आणि पुरावे त्यांनी सादर केले. या प्रकरणी आयुक्त येडगे यांनी सर्वांवर कारवाई करणार, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी कारवाई न केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू.

जलील यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना येडगे यांनी सांगितले की, मतीन पटेलच्या तीन अनधिकृत मालमत्ता नियमानुसार निष्कासित करण्यात आल्या आहेत. जलील यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची शहानिशा नगररचना विभागामार्फत करून तक्रारीत तथ्य आढळल्यास कारवाई होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Corporators' Properties Also Illegal: Imtiaz Jaleel Meets Municipal Commissioner

Web Summary : Imtiaz Jaleel submitted evidence of unauthorized BJP corporators' properties to the municipal commissioner, demanding action. The commissioner assured a thorough investigation and promised action if violations are found. Jaleel warned of legal recourse if no action is taken.
टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणMunicipal Corporationनगर पालिका