गौरी सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST2021-09-22T04:06:15+5:302021-09-22T04:06:15+5:30

गंगापूर : शहरातील संजय जाधव मित्रमंडळ, राजमुद्रा ग्रुप, ज्ञानेश्वर साबणे व संतोष ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...

Prize distribution to the winners of Gauri Decoration Competition | गौरी सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण

गौरी सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण

गंगापूर : शहरातील संजय जाधव मित्रमंडळ, राजमुद्रा ग्रुप, ज्ञानेश्वर साबणे व संतोष ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पोनि.संजय लोहकरे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, जिजाऊ फाउंडेशनच्या सुवर्णा जाधव, संतोष अंबिलवादे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, उपप्राचार्य विशाल साबणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम बक्षीस दोन ग्रॅम सोन्याची नथ प्रीती फलफले, द्वितीय बक्षीस पैठणी साडी शोभा लोखंडे व तृतीय बक्षीस सेमी पैठणी साडी सुशीला मालपाणी व देवयानी शेगुंळे यांना देण्यात आली, तसेच प्रोत्साहनपर व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले. सूत्रसंचालन रेखा राजपूत व संगीता वाघ यांनी केले. या स्पर्धेत पन्नास महिलांनी सहभाग नोंदविला होता.

210921\screenshot_20210921-164419_drive.jpg

गंगापूर : गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्यांसह मान्यवर

Web Title: Prize distribution to the winners of Gauri Decoration Competition