भाजपा इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:38:52+5:302014-08-03T01:13:33+5:30

हिंगोली : भाजपाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला.

Power show of BJP interested | भाजपा इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

भाजपा इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन

हिंगोली : भाजपाच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. चार मतदारसंघांसाठी २२ इच्छुकानी मुलाखती दिल्या.
मुलाखती घेण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस व महिला प्रदेश उपाध्यक्षा नवनीता चौधरी हे द्वयी आले होते. दुपारी १ च्या सुमारास मुलाखतींना प्रारंभ झाला. मात्र तत्पूर्वी सकाळपासूनच शहरातील विविध भागात भाजपा इच्छुक उमेदवारांचे समर्थक जमत होते. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारासाठी फेरी काढून आपला पाठिंबा दर्शविला. मुलाखतीसाठी वसमत विधानसभा मतदारसंघातून उज्ज्वला तांबाळे, कळमनुरी मतदारसंघातून अ‍ॅड. गणेश ढाले, रामराव पतंगे, सुरजितसिंह ठाकूर, पांडुरंग पाटील, शरद पाटील, संजय कावडे, पी.आर.देशमुख यांनी उमेदवारी मागितली. तर हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बाबाराव बांगर, तान्हाजी मुटकुळे, अ‍ॅड.प्रभाकर भाकरे, मनोज जैन, पुंजाजी गाडे, पंडितराव शिंदे, फुलाजी शिंदे, रामरतन शिंदे, माणिक पाटील भिंगीकर, मिलिंद यंबल, डॉ.राजेश भोसले, सुभाष लदनिया, पांडुरंग पाटील, अ‍ॅड.गजानन खिल्लारे यांनी उमेदवारी मागितली. उमरखेड मतदारसंघातील मधुकर वानखेडे या इच्छुकानेही मुलाखत दिली.
इच्छुकांची गर्दी पाहता मोठी रस्सीखेच होणार असल्याचे दिसत असून या दोलायमान स्थितीत उमेदवारीचा अंदाज येत नसल्याने सगळेच संभ्रमात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Power show of BJP interested