जीवनदायी योजनेत रूग्णांची पिळवणूक

By Admin | Updated: May 28, 2014 00:20 IST2014-05-27T23:43:56+5:302014-05-28T00:20:53+5:30

विलास भोसले , पाटोदा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश असलेल्या दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना उपचार घ्यावयाचे झाल्यास त्यांच्या मागे कागदोपत्रांचा ससेमिरा लावला जातो.

Pledging of patients in the life insurance scheme | जीवनदायी योजनेत रूग्णांची पिळवणूक

जीवनदायी योजनेत रूग्णांची पिळवणूक

 विलास भोसले , पाटोदा राजीव गांधी जीवनदायी योजनेत समावेश असलेल्या दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना उपचार घ्यावयाचे झाल्यास त्यांच्या मागे कागदोपत्रांचा ससेमिरा लावला जातो. यामुळे अडचणीत सापडलेल्या रूग्णांना वेळप्रसंगी महागडे उपचार घ्यावे लागतात. या दरम्यान रूग्णांची पिळवणूकही होत आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांना गंभीर व दुर्धर आजारावर लाखो रुपये खर्च करणे शक्य नसते. यामध्ये अनेकदा पैशांअभावी रूग्णांवर योग्य उपचारही होत नाहीत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना योग्य उपचार मिळावेत यासाठी शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केशरी शिधापत्रिका असणार्‍या कुटुंबियांचाही समावेश करण्यात आला आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना पिवळ्या शिधापत्रिका आधारे तहसीलदारांच्य माध्यमातून आरोग्यपत्र हे कार्ड देण्यात येते. या कार्डाच्या आधारे रूग्णांना शासकीय तसेच नियुक्त केलेल्या खाजगी रूग्णालयात उपचार घेता येतात. अनेकदा शासकीय रूग्णालयात उपचाराच्या सुविधा नसतात किंवा तांत्रीक अडचणी असतात. अशावेळी रूग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी खाजगी रूग्णालयाचीही मदत घेतली जाऊ शकते.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत तब्बल दीड लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रिया शासकीय खर्चातून केल्या जातात. असे असले तरी सध्या रूग्णालयात गेलेल्या रूग्णास पिवळी शिधापत्रिका मागण्यात येते. तसेच ही शिधापत्रिका २०१३ पूर्वीची असल्याचे प्रमाणपत्रही मागितले जाते. वास्तविक पिवळ्या शिधापत्रिका आधारेच आरोग्य पत्र हे कार्ड दिले जाते. यावेळी रूग्णांची पिळवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे कागदपत्रांचा ससेमिरा लावला जातो. जिल्हा समन्वयक डॉ. सय्यद म्हणाले, रूग्णांनी अडचण असल्यास आपल्याशी संपर्क करावा तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे म्हणाले, रूग्णांच्या अडचणी संदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करू.

Web Title: Pledging of patients in the life insurance scheme