खेळाडूंनी वाढीव गुण प्रस्ताव सादर करावे

By Admin | Updated: March 13, 2016 14:41 IST2016-03-13T14:33:21+5:302016-03-13T14:41:39+5:30

नांदेड : राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी वाढीव गुण प्रस्ताव ३० मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करावेत,

Players should submit an incremental proposal | खेळाडूंनी वाढीव गुण प्रस्ताव सादर करावे

खेळाडूंनी वाढीव गुण प्रस्ताव सादर करावे

नांदेड : दहावी व बारावी या वर्गात सन २०१५-१६ या वर्षात शिकत असलेल्या तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी वाढीव गुण प्रस्ताव ३० मार्चपर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले आहे.
वाढीव गुण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावा. तसेच शासन निर्णयाच्या अटीचे पालन करुन वाढीव गुण सवलतीचा प्रस्ताव प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासह संबंधित क्रीडा शिक्षकानेच हा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Players should submit an incremental proposal