शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

मनपा, जीटीएलमधील ‘तो’ करार अखेर रद्द!

By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST

औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्‍या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला.

औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्‍या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता पी. आर. बनसोडे, जीटीएलचे जगदीश चेलारमाणी, अभिजित देशपांडे, प्रशांत मजुमदार, दिलीप घोडके यांच्यातील बैठकीअंती हा निर्णय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि जीटीएलच्या कार्यालयात दोन बैठकी झाल्या. यापुढे रस्त्यांत अडथळा निर्माण करणारे जीटीएलचे खांब पालिकेच्या यंत्रणेकडून काढण्यात येणार आहेत. २०१२ पासून जीटीएलकडे विद्युत खांब काढण्याचे काम दिले. मात्र, कंपनीकडून त्यातील अर्धे काम पूर्ण झाले. आता पालिका स्वत:हून टेंडर काढून रस्त्यांतील खांब हटविणार आहे. त्यासाठी जीटीएलचा एक विभागीय स्तरावरील अधिकारी सुपरव्हिजनसाठी मनपाला देण्यात येईल. लोटाकारंजा आणि कैलासनगर या रस्त्यांतील खांब काढण्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. लोटाकारंजा रस्त्यातील खांब काढण्यासाठी जीटीएल खर्च अंदाजपत्रक पालिकेला सादर करील. त्यानुसार पालिका ते काम करणार आहे. कैलासनगर ते लक्ष्मण चावडी या रस्त्यातील खांब काढण्यासाठी कंत्राटदार एन. बी. कुलकर्णी यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जीटीएल कंपनी त्यांना एबी केबल उपलब्ध करून देणार आहे. १४ विकास आराखड्यातील ६ रस्त्यांवरील खांब जीटीएलने काढले. यापुढे जीटीएल सुपरव्हिजन करील. मनपा टेंडर काढून खाजगी ठेकेदारांकडून ते खांब हटविणार आहे. वेळोवेळी शटडाऊन घेण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पालिकेच्या सेवेत देण्यात येईल. मनपाने जीटीएलला दिले २ कोटी रुपये मनपाने जीटीएलला दिले. १२ कोटी ७६ लाख रुपयांमध्ये ५०० खांब काढण्याच्या वाटाघाटी कंपनीबरोबर झाल्या होत्या.