जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस रद्द

By Admin | Updated: April 16, 2016 23:52 IST2016-04-16T23:45:47+5:302016-04-16T23:52:16+5:30

वाशी : जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना बजावलेली नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविली आहे़

The notice issued by the District Collector has been canceled | जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस रद्द

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस रद्द

ठोंबरेंची याचिका : उच्च न्यायालयाचे आदेश
वाशी : जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना बजावलेली नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविली आहे़ जिल्हाधिकारी आणि तपासाधिकाऱ्यांमध्ये नोटीसीवरून निर्माण झालेल्या वादातून हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले होते़
याबाबत अ‍ॅड़ व्ही़डी़ सपकाळ, आदिनाथ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे हे पथकासह ५ फेब्रुवारी रोजी चारा छावण्या तपासणीसाठी गेले होते़ या पथकाने भूम तालुक्यातील संत भगवानबाबा बहुउद्देशिय ग्रामीण संस्थेच्या छावणीला भेट दिली़ त्यानंतर हे पथक परत जात असताना ईट येथे पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडविली़ तसेच घोषणाबाजी करून त्यांच्या गाडीच्या काचावर थापा मारून गोंधळ घातला होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून मंडळाधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक ठोंबरे यांच्याकडे आल्यानंतर ठोंबरे यांनी तपासाच्या कामी जबाब नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक चकरा मारल्या़ मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा जबाब त्यांना नोंदविता आला नाही़ त्यामुळे ठोंबरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६० नुसार जिल्हाधिकाऱ्यांना समन्स काढले होते़ हे समन्स निघताच जिल्हाधिकाऱ्यांनी वाशी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांना नोटीस बजावली होती़ त्यानंतर ठोंबरे यांनी उच्चपदावर असताना कायद्याची मदत न करता कायद्याचा दुरूपयोग केला, अशा तक्रारीवरून ठोंबरे यांची बदली झाल्याचे मुद्दे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेत करण्यात आले होते़
या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनवाई झाल्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी ठोंबरे यांना बजावलेली नोटीस रद्दबातल ठरविली. या प्रकरणात ठोंबरे यांच्या बाजूने अ‍ॅड़ व्ही़डी़ सपकाळ, आदिनाथ जगताप यांनी काम पाहिले़

Web Title: The notice issued by the District Collector has been canceled