शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:58 IST

कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी; पेरणीसाठी पैसे नाहीत; शेतकऱ्याने तहसीलदारांकडे मागितली आत्महत्येची परवानगी

- सुनील घोडके

खुलताबाद : येथील एका शेतकऱ्याने पेरणीसाठी पैश्यांची तरतूद होत नसल्याने आत्महत्या करण्याची परवानगी तहसीलदार यांच्याकडे मागितली आहे. या निवेदनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

खुलताबाद येथील सुभाष आसाराम तंबारे या शेतकऱ्याने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या मालकीची ०.४५ हेक्टर शेती गट क्रमांक ७/२ मध्ये आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, खुलताबाद शाखेकडून चार वर्षांपूर्वी ५०,००० रुपये कर्ज घेतले होते, जे त्यांनी दोन वेळा नूतनीकरणही केले.सध्याच्या (२०२४-२५) हंगामात त्यांनी अद्रक पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ५ क्विंटल बी बियाणे त्यांनी १२,००० रु. प्रति क्विंटल दराने विकत घेतले. पिक चांगले आले असले तरी बाजारभाव अत्यल्प म्हणजे केवळ १,२०० रु. प्रति क्विंटल मिळाला. त्यामुळे २० क्विंटल मालासाठी त्यांना केवळ २४,००० रु. उत्पन्न मिळाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी त्यांनी एकूण १,००,००० रु. इतका खर्च केला होता. अतिवृष्टी व पीक विम्याअंतर्गत त्यांना केवळ ७,००० रु. मदत मिळाली असून ती रक्कम त्यांच्या बचत खात्यावर जमा झाली आहे. परंतु स्टेट बँकेने त्यांनी घेतलेले जुने कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्या खात्यावर होल्ड ठेवले आहे आणि खात्यातील पैसे काढण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे पुढील पेरणीसाठी आवश्यक पैसा नसल्याने त्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर