शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचार्‍यांचे पुन्हा पगार थकले

By admin | Updated: May 29, 2014 00:20 IST

परभणी : महानगरपालिकेच्या सफाई कामगार, कायम व रोजंदारी कामगारांचे पगार चार ते पाच महिन्यांपासून थकले आहेत.

परभणी : महानगरपालिकेच्या सफाई कामगार, कायम व रोजंदारी कामगारांचे पगार चार ते पाच महिन्यांपासून थकले आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मनपाने कर्मचार्‍यांचे पगार करावेत, अशी मागणी परभणी शहर महानगरपालिका सफाई संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन पाठविले असून त्यात म्हटले आहे, कर्मचार्‍यांचे पगार झाले नसल्याने या कर्मचार्‍यांना दुसरीकडे काम करुन प्रपंच चालवावा लागत आहे. परंतु, एक दिवसही कामावर न गेल्यास निलंबनाच्या कारवाईसारखी नोटीस दिली जाते. तसेच एलआयसी हप्त्याचा भरणा देखील वेळेवर केला जात नाही. त्यामुळे कामगारांच्या पॉलिसीज लॅप्स होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉलिसी लॅप्स झाल्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील. पगाराबरोबरच या कामगारांना इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात नगरसेवकांच्या नातेवाईकांकडून कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे नगरसेवकांच्या नातेवाईकाचा हस्तक्षेप बंद करावा, पाच महिन्यांना थकित पगार द्यावा, एलआयसीचे कपात केलेली रक्कम खात्यावर भरणा करावी, लाड कमिटीच्या शिफारशीनुसार कर्मचार्‍यांच्या वारसांना तत्काळ नोकरीत सामावून घ्यावे, १२ वर्षांची पदोन्नती द्यावी, सफाई कामगारांचा संप काळातील पगार द्यावा, कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी महिन्यातून एक दिवस वेळ द्यावा, सफाई कामगारांना इतर पालिकांप्रमाणे एकवेळ काम द्यावे, आदी मागण्या आहेत. संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड, किरण गायकवाड, श्रावण कदम, के.के. भारसाखळे, पिराजी हत्तीअंबिरे, दत्ता खंदारे, पिराजी झिंझुर्डे, मोकिंद ढाले, सुभाष कांबळे, दत्ता गवाले, चांदू आराटे, दिलीप चौरंगे यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)