शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर होण्यासाठी उजाडणार नवीन वर्ष ?

By admin | Updated: December 2, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज वसुलीला शासनाने स्थगिती दिली असली, तरी टंचाईग्रस्त गावांची अधिसूचना न निघाल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडे व्याज वसुलीसाठी तगादा लावला आहे.


औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज वसुलीला शासनाने स्थगिती दिली असली, तरी टंचाईग्रस्त गावांची अधिसूचना न निघाल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडे व्याज वसुलीसाठी तगादा लावला आहे. मराठवाड्यासह टंचाईग्रस्त भागात प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर होण्यास नवीन वर्ष उजाडणार असल्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आमदार आणि अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या औरंगाबादेत वेगवेगळ्या बैठकाही घेतल्या. या बैठकीतच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी टंचाईग्रस्त गावांची अद्याप अधिसूचना निघाली नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री खडसे आदींनी शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला किंवा व्याज वसुलीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र, टंचाईग्रस्त गावांचे नोटिफिकेशनच न निघाल्याने बँकांनीही शेतकऱ्यांकडे कर्जावरील व्याज वसुलीसाठी तगादा लावला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, अशांना बँकांमार्फत कर्ज तसेच व्याज वसुलीच्या नोटिसाही काढल्या आहेत. काहींना जिल्हा विधिसेवा समितीमार्फत तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये बोलाविण्यात येत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी व्याज वसुलीला स्थगिती असताना आणि हलाखीच्या स्थितीतही व्याजाची रक्कम भरली आहे.
दुसरीकडे राज्य सरकारने केंद्राकडे चार हजार कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव अद्याप धाडला नाही, अशी माहिती मिळते. प्रस्ताव गेल्यानंतर केंद्र सरकारची टीम दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येईल. अहवाल केंद्र सरकारला दिल्यानंतर दुष्काळाची आणि मदतीची घोषणा होईल.
शासनाने अद्याप टंचाईग्रस्त गावांचे नोटिफिकेशन काढलेले नाही. त्यासाठी वेळ असला तर शासनाने कर्ज आणि व्याज वसुलीला स्थगिती दिल्याचे तरी शासकीय आदेश निघायला हवेत.
४अधिकारी घोषणेवर विश्वास ठेवत नाहीत, तर त्यांना आदेशाची प्रत हवी असते, असे शेतकऱ्यांना वाटत असते.