छत्रपती संभाजीनगर : एस.टी. महामंडळाच्या प्रवास भाड्यात प्रतिप्रवासी २ रुपये स्वच्छता अधिभार लागू झाला आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येत आहे. स्वच्छता अधिभार घेण्यात येत असताना बसस्थानक आणि बसमधील अस्वच्छता पाहून प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाची गेल्या काही वर्षांत पार दुरवस्था झाली आहे. त्यात अस्वच्छतेमुळे बसस्थानक आणखी बकाल होत आहे. जागाेजागी प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली फेकलेल्या पाहायला मिळाल्या. काही बसेसची पाहणी केली असता, प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. सिडको बसस्थानकातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळाली. पुढील काळात स्वच्छतेत सुधारणा दिसून येईल, असा दावा एस. टी. महामंडळ प्रशासनाकडून केला जात आहे.
रक्कम ठळकपणे लिहास्वच्छता अधिभार घेतला जात आहे. परंतु तिकिटात त्याची रक्कम ठळकपणे आणि स्वतंत्रपणे नमूद केली पाहिजे. सध्या या अधिभारासह तिकीट दिली जात आहे. स्वच्छतेत सुधारणा झाली पाहिजे.- वैभव शिंदे, प्रवासी
स्वच्छ बस हवीशिर्डीला जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छता आहे पण स्वच्छतेत आणखी सुधारणा झाली पाहिजे. बसही स्वच्छ पाहिजे.- तेजस्विनी इंगळे, प्रवासी
स्वच्छतेत सुधारणा होईललवकरच स्वच्छतेचे काम एजन्सीमार्फत सुरु होईल. त्यातून बसेस आणि बसस्थानकातील स्वच्छतेत आणखी सुधारणा होईल.- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
Web Summary : Despite a new cleanliness fee, bus stations and buses remain unclean, sparking passenger frustration. Passengers want the fee clearly marked on tickets and demand cleaner buses and stations. The ST Corporation promises improvements soon through agency-led cleaning.
Web Summary : सफाई शुल्क लगने के बाद भी बस अड्डे और बसें गंदी हैं, जिससे यात्री नाराज़ हैं। यात्रियों की मांग है कि टिकट पर शुल्क स्पष्ट रूप से लिखा जाए और बसों-अड्डों को साफ किया जाए। एसटी निगम ने एजेंसी के जरिए जल्द सुधार का वादा किया है।