शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव क्षणिक गोष्टी

By admin | Updated: July 19, 2014 00:43 IST

जालना : मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव या सर्व क्षणिक गोष्टी आहेत. तुमचे बोलणे कसे आहे, यावरुन तुमची प्रगती आणि अधोगती ठरते, तुमचे बोलणे चांगले तर जग चांगले, असे प्रतिपादन

जालना : मनुष्य जीवनात पैसा, गौरव, नाव या सर्व क्षणिक गोष्टी आहेत. तुमचे बोलणे कसे आहे, यावरुन तुमची प्रगती आणि अधोगती ठरते, तुमचे बोलणे चांगले तर जग चांगले, असे प्रतिपादन प. पू. गौरवमुनी म. सा. यांनी केले. ते जालना स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे आयोजित चातुर्मास प्रसंगी बोलत होते. जीवनात जिव्हा (जिभे) ला मोठे महत्व असून बोलण्याचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. यात एक विचार करुन बोलणे, दुसरा बोलताना विचार करणे आणि तिसरा बोलल्यावर विचार करणे.यात आपण कुठे आहोत याचे आत्म परीक्षण करावे आणि आपण कशात हवे हे ठरवा, असे पू. गौरवमुनी म. सा. यांनी सांगितले.वायफळ भांडणे निर्माण होतील, कोणाचे नुकसान होईल किंवा कोणी दुखावले जाईल असे बोलणे टाळावे, असे सांगून मुनीश्री म्हणाले की, भांडणातून वाद होताच, आरोग्य खराब होते, सुख-शांती बिघडते, असे सांगून ते म्हणाले की, मनुष्याने पोलिस ठाणे, कोर्ट आणि दवाखाना या तीन पायऱ्या कधीही चढू नये. या पायऱ्या चढल्या तर फायदा कमी आणि नुकसान जास्त होते.अदालत या शब्दाचा अर्थ सांगताना प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांनी अ-आईये-, दा-दालीये (पैसे, वेळ, प्रतिष्ठा), ल-लढीये (आपसात खरे-खोटे करा), त-तबाह हो जाईये, असा अर्थ सांगत अदालतीची वेळ आपले बोलणे चांगले असेल तर येणार नाही.डॉक्टरची पायरी ही आपले जीवन पध्दती, शरीर स्वास्थ्यासाठी वेळ न दिल्याने चढावी लागते. तर पोलिस ठाण्याची पायरी ही कोणाच्या तरी वादात बोलणे, विचार करुन न बोलणे यामुळे चढावी लागते. चांगले काम करायला आज आपल्याकडे वेळच नसल्याचे सांगत अनेकांना चांगली आवड असते; परंतु सवड नसते. त्यांनी आवड जपण्यासाठी सवड काढावी, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)जेव्हा एखादे स्थळ (मुलगी) बघायला गेल्यावर आपण तिला किती शिक्षण झाले, काय काय येते, हे येते का, ते येते का, हे विचारतो; परंतु वास्तवात आपण तिला रामायण्थडा कशामुळे घडले किंवा साधु संतांविषयी विचारावे, त्यांची साधना, त्याग, कार्य याविषयी विचारावे. यामुळे आजचे शिक्षण जसे जरुरी आहे तसेच इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे. मागच्या इतिहासाच्या घटनेतून बरेच काही शिकण्यासारखे असते आणि यातून सुधारणा होत असल्याचे प. पू. गौरवमुनीजी म. सा. यांनी सांगितले.