शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉडेल’ इमारतीसाठी जागेचा प्रश्न रखडला

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

विठ्ठल भिसे, पाथरी राज्य शासनाने मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण आपल्या तालुक्यातच घेता यावे, यासाठी मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला

विठ्ठल भिसे, पाथरी राज्य शासनाने मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण आपल्या तालुक्यातच घेता यावे, यासाठी मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला खरा़ परंतु, पाथरी तालुक्यात या शाळेच्या इमारतीसाठी अद्यापही जागेचा शोध पूर्ण झाला नाही़ पर्यायाने तिसर्‍या वर्षीही हे मॉडेल इंग्लिश स्कूल जिल्हा परिषदेच्या जुन्या दोन वर्ग खोल्यांमध्येच भरवावे लागणार आहेत़ विशेष म्हणजे शासनाकडून निधी मंजूर असतानाही केवळ जागेअभावी इमारत उभी राहत नसल्याने विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान दर्जेदार मिळावे यासाठी राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला़ सुरुवातीला या विद्यालयाला मंजुरी देण्यात आल्यानंतर कंत्राटी स्वरुपात शिक्षकांच्या जागा भरून पहिल्या वर्षी इंग्रजी विषयातून सहावीचा वर्ग सुरू करण्यात आले़ एकीकडे मान्यता देत असताना दुसरीकडे निवासी स्वरुपातील या शाळांना इमारत बांधकाम आणि वस्तीगृहाची सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ पाथरी तालुक्यात हे विद्यालय सुरू झाल्यानंतर पाल्यांना सर्व सोयी सुविधा या विद्यालयात मिळतील, अशी अपेक्षा पालक वर्गामध्ये होती़ परंतु, शासनाच्या बहुउद्देश सफल होत नसल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर उमटत आहे़ या विद्यालयासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती असून, या समितीकडून जागेचा शोध घेतला जात आहे़ परंतु, अद्यापही शोध न लागल्याने मॉडेल स्कूलचे भवितव्य अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे़ दोन हेक्टर शासकीय जमिनीवर हे विद्यालय सुरू करण्यासाठी सुरुवातीला शोध घेण्यात आला़ परंतु, या इमारतीसाठी अद्यापही जागा उपलब्ध झाली नाही़ सहावी आणि सातवी हे दोन वर्ग शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सुरू करण्यात आले़ या दोन वर्गखोल्यांसाठी तात्पुरती डागडुजी करून फर्निचर करण्यात आले़ नवोदय विद्यालयाच्या धरतीवर हे विद्यालय सुरू करण्यात आल्याने या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांकडून सुरुवातीपासूनच मोठी गर्दीही होऊ लागली़ पर्यायाने एका वर्गात ४० विद्यार्थी अपेक्षित असताना प्रवेशासाठी अनेक अर्ज आले़ त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़ पाथरी शहरात सर्वे नं़ ६७ मध्ये मोठ्या प्रमाणावर गायरान जमीन आहे़ या जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत़ या भागातील काही जमीन मॉडेल इंग्लिश स्कूलसाठी देण्याबाबत सुरुवातीला निर्णय झाला़ परंतु, यामध्ये काही हितचिंतकांनी अडथळे निर्माण करून या ठिकाणी होऊ घातलेल्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीला खोडा घातल्याने इमारतीचा प्रश्न सुटू शकला नाही़ शासनाकडून निवासी स्वरुपात बांधण्यात येणार्‍या इमारतीसाठी पाच एकर जमीन आवश्यक आहे़ शहरातील काही भागामध्ये सरकारी जमिनीचा शोधही घेण्यात आला़ परंतु, जमीन मात्र मिळू शकली नाही़ बोरगव्हाण शिवारात जायकवाडीची जमीन आहे़ ही जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न झाले़ परंतु, या ठिकाणावरूनही जमिनीबाबत निर्णय न झाल्यामुळे पुन्हा इतरत्र शोध घेण्याची वेळ महसूल प्रशासनावर आली आहे़ शासनाकडून जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात मंजूर असलेल्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे कामे प्रगती पथावर आहेत़ परंतु, पाथरी तालुक्यात या शाळेसाठी जागा मिळत नसल्याने ही शाळा कायमस्वरुपी बंद होईल की काय अशी भिती पालकांमध्येही व्यक्त करण्यात येऊ लागली आहे़ पर्यायाने येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे़