वैजापुरात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

By | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:48+5:302020-12-02T04:10:48+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पीडित महिला खंडाळा येथे आई, वडील व बहिणीसोबत राहते. घटनेच्या दिवशी आई कामासाठी बाहेर गेली ...

Marriage of a married woman by breaking into a house in Vaijapur | वैजापुरात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

वैजापुरात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पीडित महिला खंडाळा येथे आई, वडील व बहिणीसोबत राहते. घटनेच्या दिवशी आई कामासाठी बाहेर गेली होती. तसेच वडील हे घराचे बाहेर होते. यावेळी आरोपी किरण रामराव पवार हा घरी आला व त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी पीडिता घरात गेली असता, तोही घरात गेला व विनयभंग केला. याबाबत महिलेले वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पवारला जाब विचारला. तेव्हा त्याने पीडितेच्या वडिलांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पीडितेची आई, वडील, बहीण व आत्या घरात असतांना पुन्हा किरण पवार व त्याची मैत्रीण दुर्गा बाबासाहेब गवारे हे दोघे आले. यावेळी दुर्गा हिने पीडितेला जातिवाचक शिवीगाळ केली. पीडितेची गरोदर बहीण भांडण सोडवण्यासाठी आली असतांना तिच्या पोटात लाथा मारल्या. असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन किरण रामराव पवार व दुर्गा बाबासाहेब गवारे यांच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाण, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marriage of a married woman by breaking into a house in Vaijapur