छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पारा ४० पार झाले असून नांदेडमध्ये सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. दोन दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या झळांमुळे जिवाही काहिली होत असून दुपारच्या वेळी शहरांसह प्रमुख मार्ग सुनसान झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात भीषण उष्णतेचा एक बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली बसस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर १५ एप्रिल रोजी पहाटे एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शेख रफिक शेख उस्मान (रा. आनसिंग, ता. वाशिम, ह.मु, जवळा बुद्रुक, ता. हिंगोली) असे मृताचे नाव असून, त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला. या घटनेची हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. तपासानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
हिंगोलीकर घामाघूमआठवडाभरापासून दररोज तापमानात वाढ होत असल्याने हिंगोलीकरांच्या अंगाची काहिली होत आहे. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यात ४० अंश एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले. या उन्हाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी तर बाजारपेठ अक्षरशः ओस पडत आहे.
नांदेडचा पारा ४२ अंशावरनांदेड : काही दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस आणि वादळवारा झाला होता. त्यानंतर सातत्याने तापमानात वाढ होत आहे. बुधवारी नांदेडचा पारा ४२ अंशांवर पोहोचला होता. परिणामी दिवसा शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्यास सुरुवात झाली होती. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. परिणामी नांदेडकर घामाघूम झाले होते.
तापमान आणखी वाढण्याचा अंदाज१३ एप्रिल रोजी ४१.२ अंशांवर असलेले तापमान १४ एप्रिल रोजी ४२ वर गेले होते. त्यानंतर १५ एप्रिल रोजीही पारा ४२ अंश एवढा नोंदविला गेला. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. परिणामी नांदेडकर घामाघूम झाले होते. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वैज्ञानिक सहायक सिद्धार्थ मानवटकर यांनी वर्तविला. मागील वर्षी नांदेडचा पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला होता.
शहर आणि तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)नांदेड ४२परभणी ४१बीड ४१धाराशिव ४१संभाजीनगर ४०.८जालना ४०.८लातूर ४०हिंगोली ४०
Web Summary : Marathwada reels under intense heat; temperatures exceed 40°C in all districts. Nanded recorded 42°C. A 30-year-old died of suspected heatstroke in Hingoli. Power outages exacerbate the situation, with warnings of further temperature increases.
Web Summary : मराठवाड़ा भीषण गर्मी की चपेट में, सभी जिलों में तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर। नांदेड़ में 42 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। हिंगोली में लू लगने से एक 30 वर्षीय व्यक्ति की मौत। बिजली कटौती से हालात और खराब, तापमान बढ़ने की चेतावनी।