शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतून ऑनलाइन लग्न अन् छ. संभाजीनगरात अत्याचार; श्रीमंतीचा बनाव रचणारा भामटा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:35 IST

लग्नाचा कंटाळा आल्यानंतर आर्थिक घोटाळ्यात अटक झाल्याचे सांगून झाला पसार; बलात्काराचा गुन्ह्यात तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर : एका प्रशिक्षणादरम्यान ओळख झाल्यानंतर मोठ्या महाविद्यालयाच्या प्राचार्याचा मुलगा, श्रीमंत कुटुुंबातील भासवून एका तरुणाने तरुणीसोबत दुबईतून व्हिडिओकॉलवर ऑनलाइन लग्न केले. त्यानंतर शहरात येत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर लग्नास नकार दिला. याप्रकरणी शेख अब्दुल रहेमान अहेमद शेख रिजवान अहेमद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून जिन्सी पोलिसांनी त्याला अटक केली.

संगणकशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची अब्दुल रहेमान सोबत एका प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. तेव्हा त्याने स्वत:ला उच्चशिक्षित भासवून त्याचे वडील एका प्रख्यात महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, तरुणीला सहज तेथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तिच्यासोबत संवाद वाढवून तिच्या कुटुंबालाही विश्वासात घेत लग्नाचे आश्वासन दिले. जुलै, ऑगस्टमध्ये त्याने तरुणीसोबत विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ऑनलाइन लग्नाचा घाटकाही दिवसांनी अब्दुल रहेमान दुबईला गेला. तेथूनही तो तरुणीच्या संपर्कात होता. अचानक त्याने ऑनलाइन लग्न करण्याचा हट्ट करून लग्नही केले. नोव्हेंबरमध्ये शहरात परतल्यानंतर त्याने पुन्हा तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न केल्याचे कारण करत हैदराबादला नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. शहरात परतल्यानंतर मात्र त्याच्या घरच्यांनी तरुणीला स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय, तरुणीच्या कुटुंबानेदेखील लग्न झाल्याचे सांगून तरुणीला घरात घेण्यास नकार दिला.

गुन्ह्याचे केले नाटकअब्दुल रहेमानने त्याच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. शिवाय, त्याला अटक होणार असल्याचे सांगून संपर्क बंद केला. जानेवारी महिन्यात जामिनावर सुटल्याचे सांगून पुन्हा तरुणीला भेटून तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या या बनावाला कंटाळून तरुणीने जिन्सी पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. त्यानंतर त्याला अटक केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी