शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात गुटखा माफियांवर FDA चा सर्जिकल स्ट्राईक! ७ दुकाने सील, लाखोंचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:20 IST

नवनियुक्त आयुक्तांचा धडाका! शहर आणि ग्रामीण भागात गुटखा विक्रेत्यांवर छापे; लाखोंचा मुद्देमाल जप्त.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने गेल्या २ दिवसांत कारवाईचा बडगा उगारला आहे. नवनियुक्त आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात धडक मोहीम राबवत ७ विक्रेत्यांवर छापे टाकले. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दुकाने सील करण्यात आली असून, सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले.

भेसळयुक्त अन्नपदार्थ, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या सूचना नवीन आयुक्तांनी दिल्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी करत शहरात अवैध विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर थेट कारवाईला सुरुवात झाली आहे.

या सात ठिकाणी टाकले छापे१. बेस्ट पानशॉप (वखार महामंडळासमोर, जुना बीड बायपास)२. खलील पान सेंटर (जुना बीड बायपास)३. चांगदेव दगडू डुबिले (सुंदरनगर, बागेश्वरवाडी)४. शेख सुभान बानू (बायजीपुरा, इंदिरानगर)५. मे. आर.आर. चिकन शॉप (दौलताबाद)६. धनलक्ष्मी पानशॉप (एमआयडीसी वाळूज)७. रफिक हैदर कुरेशी (पैठण)

गुन्हे नोंदवलेप्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातही विक्रेत्यांवर त्या संबंधित ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध (भारतीय न्याय संहिता) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाईही मोहीम अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस.आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त विवेक पाटील आणि दयानंद पाटील यांच्या नेतृत्वात अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, सुलक्षणा जाधवर, ज्योत्सना जाधव, प्रज्ञा सुरसे तसेच प्रशांत अजिंठेकर, प्रशांत कुचेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांनी यशस्वी केली.

अधिक तीव्र मोहीम होईलगुटखा हा प्रतिबंधात्मक आहे. कोणीही तो विकताना आढळल्यास त्याच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. ही मोहीम पुढेही अशाच पद्धतीने आणि अधिक तीव्रतेने राबवली जाईल.- विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

English
हिंदी सारांश
Web Title : FDA's Surgical Strike on Gutka Mafia in Chhatrapati Sambhajinagar!

Web Summary : FDA raided gutka sellers in Chhatrapati Sambhajinagar, sealing seven shops and seizing goods worth lakhs. The operation, led by new commissioner Shridhar Dube Patil, enforces the ban on gutka and aims to curb illegal sales. Strict action will continue against offenders.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTobacco Banतंबाखू बंदी