शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ६५ कोटींचा चुना

By admin | Updated: February 18, 2016 00:07 IST

औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा,

औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा, त्यानंतर तत्कालीन अभियंता, लाईनमन यांना हाताशी धरून दुसऱ्या नावाने नवीन कनेक्शन घ्यायचे, अशा प्रकारचे फंडे वापरून हजारो ग्राहकांनी महावितरण कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. बिल बुडविणाऱ्या शहरातील तब्बल ३० हजार ग्राहकांची यादी महावितरणने तयार केली आहे. त्यांच्याकडे ६५ कोटी रुपये थकले असून त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे.औरंगाबाद शहरातील ४९ हजार १३८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. यापैकी ३० हजार ग्राहकांनी महावितरणचे ६५ कोटी रुपये बुडविल्याची माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळामध्ये जालना औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या विभागांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ग्राहक तर औरंगाबाद ग्रामीण भागातील १ लाख ११ हजार ग्राहकांनी बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यात ग्रामीण भागातील कृषिपंपांची संख्या अधिक आहे. यातील ८० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, असे असले तरी ज्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, त्या जागेवर जुने बिल भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देऊ नये, असा नियम आहे, असे असताना संबंधित जागेवर आज खरेच वीज आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठीही आम्ही विशेष मोहीम राबवीत आहोत. मार्चमध्ये मोहिमेला सुरुवात होईल.